SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुजरात टायटन्सच्या पहिल्या पराभवाला कर्णधार जबाबदार; तर कर्णधार म्हणाला ‘त्यांच्या’ चुकीमुळे हरलो

मुंबई :

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2022 चा 21 वा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने शानदार विजयाची नोंद करत गुजरात टायटन्सचा विजय रथ रोखला. आयपीएलच्या या हंगामातील गुजरातचा हा पहिलाच पराभव आहे, तर हैदराबादने दुसरा सामना जिंकला आहे. या सामन्यात हैदराबादने गुजरातचा 8 विकेटने पराभव केला.

Advertisement

चार गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने दिलेले 163 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने 5 चेंडू आणि 8 गडी राखून सहज पार केले. मात्र गुजरातचा हा पहिला पराभव असल्याने हैदराबादच्या जिंकण्यापेक्षा गुजरातच्या पराभवाची चर्चा जास्त झाली. काही लोकांनी या पराभवाला कर्णधाराला म्हणजेच हार्दिकला जबाबदार धरले. तर हार्दिकने कशामुळे पराभव झाला, याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हार्दिक पंड्याने संघाचा डाव सावलला, त्याने 42 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. यात 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. पण हार्दिकची हीच खेळी संघाच्या पराभवाला जबाबदार ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कमीत कमी चेंडूत अधिक धावा केल्या तरच मोठी धावसंख्या उभी करता येते. अशात हार्दिकने 42 चेंडूत फक्त 50 धावा केल्या. त्याची ही धीमी फलंदाजी संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

Advertisement

तर सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, ‘फलंदाजी करताना आम्ही 7 ते 10 धावा कमी केल्या, या धावा शेवटी खूप महत्त्वाच्या असतात. गोलंदाजीतील दोन खराब षटकांनी आमचा खेळ खराब केला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये संघाने विकेट गमावल्याने मोठी धावसंख्या उभारता आली नाही. याच कारणामुळे कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीवर नाराज होता.

गुजरात टायटन्सने फलंदाजीसाठी येत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीला आलेले डेविड वेड आणि शुभमन गिल मैदानावर तग धरू शकले नाही. वेडने 19 तर शुभमन गिलने 7 धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या साई सुदर्शनने 11 धावा केल्या.

Advertisement