SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चहलसोबत घडलाय आणखी एक भयानक प्रकार, ‘या’ दोन खेळाडूंचा ‘कार्यक्रम’ होणार..!

खरं तर क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ असल्याचं म्हटलं जातं.. मात्र, कधी कधी या खेळाची, खेळाडूंची दुसरी काळी बाजूही लोकांसमोर येते.. ती पाहिल्यावर, ऐकल्यावर आपण हादरुन जातो.. क्रिकेटमध्ये असंही घडू शकतं, यावर विश्वास बसत नाही..

भारताचा दिग्गज लेग स्पीनर यजुवेंद्र चहल याने काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक किस्सा शेअर केला होता. त्यात त्यानं असं सांगितलं होतं, की 2013 मध्ये ‘आरसीबी’च्या एका खेळाडूने पार्टीदरम्यान दारुच्या नशेत इमारतीच्या 15 मजल्यावरील बाल्कनीतून त्याला खाली लटकवलं होतं.. असं करणाऱ्या खेळाडूचं नाव मात्र त्यानं सांगितलं नव्हतं..

Advertisement

दरम्यान, आता पुन्हा एकदा चहलच्या बाबतीतच आणखी भयानक किस्सा समोर आलाय..  एका मुलाखतीत चहलने त्याच्यासोबत झालेल्या दुष्कर्माची कहाणी सांगितली आहे.. याबाबत जाणून घेऊ या..

नेमकं काय घडलं..?

Advertisement

चहल म्हणाला, की “ही 2011 ची घटना आहे.. मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग जिंकली होती. मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईत असताना, ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यु सायमंड्स व न्युझीलंडचा जेम्स फ्रँकलिन या दोघांनी भरपूर मद्यपान केलं होतं.. त्यामुळे ते नेमकं काय करीत होते, हे त्यांनाही कळत नव्हतं..!”

सायमंड्स व फ्रँकलिनने चहलचे हात-पाय बांधले. नंतर या दोघांनी चहलला सांगितले, की ‘आता तू तुझे हात-पाय सोडवून दाखवं..’ त्यानंतर या दोघांनी चहलच्या तोंडाला टेप लावली नि ते दोघे पुन्हा पार्टीत मश्गुल झाले. आपण चहलला बांधून ठेवलंय, याचही त्यांना भान राहिलं नाही. रात्रभर चहल त्याच अवस्थेत पडून होता..

Advertisement

नंतर सकाळी एक कर्मचारी हॉटेलची ती रुम साफ करण्यासाठी आला असता, त्याला चहल अशा भयानक अवस्थेत दिसला. नंतर त्या कर्मचाऱ्याने आणखी काही लोकांना बोलावून चहलची सुटका केली.. विशेष या दोघांना झालेल्या या प्रकाराबाबत कधी माफीही मागितली नसल्याचे चहलने सांगितले..

प्रकरणाची चौकशी होणार..

Advertisement

दरम्यान, अँड्र्यु सायमंड्स व जेम्स फ्रँकलिन हे दोन्ही खेळाडू निवृत्त होऊन बरेच दिवस झालेत. जेम्स फ्रँकलिन हा सध्या डरहम काऊंटी क्रिकेट क्लबचा मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र, चहलने केलेल्या आरोपांनंतर आता या क्लबने या प्रकरणाची वैयक्तिकरित्या चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत क्लबने असं म्हटलंय, की “आम्हाला आताच 2011 च्या एका घटनेबाबत माहिती मिळाली. या प्रकरणात आमच्या एका कोचिंग स्टाफचे नाव आलंय. आमच्या कर्मचाऱ्याबाबतच्या कोणत्याही मुद्द्यावर सत्य जाणून घेण्यासाठी क्लब संबंधित व्यक्तींशी वैयक्तिकरित्या बोलणार आहे..”

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement