SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एक लाखाचे झाले 18 लाख; ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले खूप कमी काळात मालामाल

शेअर बाजारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगलेच चढउतार पाहायला मिळाले आहे. मात्र यामध्ये अनेकांनी चांगला नफा कमावला आहे. तर काही शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलेआहे. अनेक पेनी स्टॉक्सने 2021 मध्ये गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना 1725 टक्के परतावा दिला आहे. बोरोसिल शेअर (Borosil Share Price) देखील त्यापैकी एक आहे. कंपनीने गेल्या 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात कितीतरी पटीने वाढ केली आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 557.50 रुपयांवरून 654 च्या पातळीवर गेला आहे. या काळात या शेअरमध्ये 16 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर आपण गेल्या 6 महिन्यांबद्दल बोललो, तर या स्टॉकची किंमत 330 रुपयांवरून 654 रुपयांपर्यंत वाढली आहे.

Advertisement

याशिवाय गेल्या एक वर्षातील आकडेवारी पाहिली तर हा स्टॉक 245 रुपयांवरून 654 च्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत, स्टॉकमध्ये सुमारे 165 टक्के वाढ झाली आहे. बोरोसिलचे शेअर्स सुमारे 35.70 रुपयांवरून 650 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी 1725 टक्के परतावा दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 2.65 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज 18.25 लाख झाले असते.

Advertisement