SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यामाहाची ‘ही’ स्टाईलीश बाईक आज होणार लॉंच, आकर्षक फीचर्स घ्या जाणून..

यामाहा मोटर इंडिया (Yamaha Motors India) आपल्या शक्तिशाली मोटरसायकल MT15 ची नवीन आवृत्ती लवकरच बाजारात आणणार आहे. अतिशय स्टायलिश लुक असणाऱ्या V2.0 बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. यामाहाची ही जबरदस्त बाईक आगामी काही आठवड्यांतच लॉंच होण्याची शक्यता आहे.

कंपनीने मागील मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.46 लाख रुपये ठेवली होती. परंतु आता या नवीन बाईकच्या किंमतीत थोडीशी वाढ होणार आहे. MT15 ही Yamaha YZF-R15 V4 ची स्ट्रीट नेकेड आवृत्ती असल्याचं बोललं जातंय, जिचे इंजिन आणि प्लॅटफॉर्म देखील त्यावर बेस्ड आहे.

Advertisement

नवीन बाईकमध्ये काय खास असेल..?

नवीन MT15 मध्ये जुन्या मॉडेलच्या असणाऱ्या रंगांच्या तुलनेत आकर्षक नवीन रंगांत लॉंच केली जाईल.बबाईकच्या सस्पेन्शन सेटअपमध्ये जरासा चेंज येणार आहे. जुन्या मॉडेलमध्ये मिळणाऱ्या गोल्डन फॉर्क्सऐवजी कंपनी आता नवीन फॉर्क्स देईल. यामाहा YZF-R15 V4 च्या फीचर्सनुसार या नवीन बाईकमध्ये क्विक शिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोलसुद्धा दिले जाणार आहेत.

Advertisement

बाईकला आधीच्या सारखेच 155 cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळणार जे 10,000 rpm वर 18.1 bhp पॉवर आणि 7,500 rpm वर 14.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन यामाहाच्या VVA तंत्रज्ञानासह 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडले गेलेले आहे. यासोबतच USD फोर्क, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ड्युअल-चॅनल ABS यांचा समावेश असणार अशीही माहीती आहे.

यामाहाच्या नवीन Yamaha MT15 या बाईकची टक्कर भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या TVS Apache RTR 200 4V, Bajaj Pulsar NS 200 आणि KTM Duke 200 यांसारख्या बाइक्सशी होणार आहे. यामुळे या कंपन्यांचा एकमेकांना तगडं असं आव्हान असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement