SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. काम करण्याच्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक गोष्टीबाबत बारकाईने विचार करा. दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल पण नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल.

वृषभ (Taurus): अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत. नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. कामा-धंद्यात कठिण परिश्रम करावं लागेल. वैचारिकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. कुटुंबात आनंदीत वातावरण असेल. आज तुमचे मन चंचल राहील. निर्णय घेणे कठीण जाईल.

मिथुन (Gemini) : जवळचा प्रवास कराल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. पैसा मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्याच्या जीवनात आनंदी वातावरण निर्माण होईल. आरोग्य सुद्धा चांगले राहील. तसे न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. महत्त्वपूर्ण काम पुरे करू शकणार नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांची कृपादृष्टी असेल. पदोन्नतीची संधी मिळेल.

कर्क (Cancer) : नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका.आरोग्याची काळजी घ्या. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांच्या कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल.

Advertisementसिंह (Leo) : मानसिक स्थैर्य जपावे. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवनवीन संधी उपलब्ध होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. कठिण परिश्रमानंतर तुमच्या कामात यश येईल. आरोग्य निरोगी राहील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्हाला प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल.

कन्या (Virgo) : अकारण होणारा खर्च टाळावा. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. वायफळ खर्च करणं टाळा. मित्र-मैत्रिणींकडून तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. स्वादिष्ट भोजन आणि चांगले कपडे घालायला मिळतील.

तुळ (Libra) : आहाराकडे लक्ष ठेवा. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. व्यापाऱ्याच्या दृष्टीने केलेल्या प्रवासाचे फायदे होतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.आज आपण खिन्नता आणि भय अनुभवाल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक चंचलता जाणवेल. कमिशन मधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे. आवडी निवडी बाबत दक्षता बाळगाल. व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन स्थिर राहील. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात.

Advertisementधनु (Sagittarius) : कामातील दिरंगाई टाळावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल.व्यवसायात होणाऱ्या प्रगतीमुळे प्रसन्न राहाल. राजकारणात यश मिळाल्याने आनंदी रहाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तणाव निर्माण होऊ शकतो. आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्त होईल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

मकर (Capricorn) : झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. रखडलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक आयुष्यात तुम्हाला प्रसन्नता मिळेल. मित्रांबरोबर रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल.

कुंभ (Aquarious) : वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. भगवान श्री गणेशाची पूजा करा. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. मुलाची भेट होईल. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली ती पूर्ण होईल.

मीन (Pisces) : आवाक्याबाहेर खर्चाचा ताळमेळ घालावा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल. व्यापार आणि नोकरीत उन्नती होईल. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. आजपासून शंकराची पूजा कराल. अनपेक्षित खर्च करणं टाळा. बाहेर फिरायला जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल.व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे.

Advertisement