SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एप्रिलपासून ‘या’ लोकप्रिय कंपन्यांचे चॅनल होणार बंद; वाचा संपूर्ण विषय थोडक्यात

प्रसार भारतीच्या मालकीच्या डायरेक्ट टू होम म्हणजेच डीटीएच प्लॅटफॉर्मवरून येत्या 1 एप्रिलपासून चार मोठ्या कंपन्या त्यांचे चॅनल काढून घेणार आहेत. हे चॅनल मोफत दिले जात होते. आता मात्र या चॅनल्सला आपला महसूल बुडेल, अशी भीती असल्याने त्यांनी आपले चॅनल डीटीएचवरून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता हे सगळे चॅनल्स पाहण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. हे सगळे चॅनल्स भरपूर मनोरंजन करत होते.

हे आहेत ‘ते’ 4 चॅनल :-
डीडी फ्री डिशवरून हटविण्यात येणाऱ्या या चॅनलमध्ये स्टार उत्सव, झी अनमोल, कलर्स रिश्ते आणि सोनी पल यांचा समावेश आहे. दरम्यान हे चॅनल केबल, टाटा प्ले, एअरटेलसारख्या पेड डीटीएच प्लॅटफॉर्मवरच उपलब्ध असणार आहेत. हे सगळे चॅनल्स पाह्ण्यासाठी आता आपल्याला खिसा थोडासा का होईना, खाली करावा लागणार आहे.

Advertisement

स्वतःच्या फायद्यासाठी घेतला निर्णय :- 
नवीन टॅरिफ आदेश २.० लागू झाल्यानंतर पैसे देणारे ग्राहक मोफत चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास सुरुवात करतील अशी भीती या कंपन्यांना वाटू लागली आहे. यामुळे या कंपन्यांचा महसूल बुडेल. यामुळे डीडीच्या मोफत डीटीएचवर या कंपन्या देत असलेले चॅनल तिकडून काढून घेण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे. याचा त्यांना फायदा होणार आहे.

Advertisement