SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘मारुती अल्टो’ नव्या रुपात येणार, नव्या माॅडेलमध्ये असणार ‘अशी’ धमाकेदार फीचर्स..!

मारुती अल्टो.. मध्यमवर्गीय लोकांची सर्वाधिक लोकप्रिय कार.. स्वस्तात मस्त.. शिवाय आकर्षक फिचर्समुळे ही कार सर्वसामान्य नागरिकांमध्ये फार लोकप्रिय आहे.. ‘मारुती सुझुकी’ची ही सर्वात खास कार असून, तिला मोठ्या प्रमाणात मागणीही असते.. आता ही गाडी नव्या रंगात, नव्या ढंगात दाखल होणार आहे.

‘मारुती सुझुकी’ (Maruti Suzuki) कंपनी आपल्या अनेक गाड्यांचे ‘नेक्स्ट जनरेशन मॉडेल’ आणण्याच्या तयारीत आहे. त्यात ‘मारुती अल्टो’ (Maruti Alto)चाही समावेश आहे. मात्र, लाँचिंगपूर्वीच या गाडीची एक झलक नुकतीच समोर आली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते..

Advertisement

‘मारुती अल्टो’चे नवे माॅडेल कसं असेल, त्यात कोणकोणती फिचर्स असतील, या माॅडेलची किंमत काय असेल आदी प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊ या..

कसे असेल नवं माॅडेल..?

Advertisement

‘मारुती अल्टो’च्या आतापर्यंतच्या सगळ्या मॉडेल्सच्या तुलनेत ही नवी कार अगदीच वेगळी असणार आहे. ‘अल्टो’ म्हटलं, की छोटी गाडी, कमी उंचीची असणार, असे बऱ्याच जणांना वाटतं.. मात्र, नवी अल्टो (Alto 2022) ही आकाराने नि उंचीनेही मोठी असणार आहे. ही गाडी ‘HEARTECT’ प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली जाणार असल्याचे समजते.

‘मारुती सुझुकी’ने आपल्या ‘एस-प्रेसो’, ‘सेलेरियो’ आणि ‘वॅगन-आर’ व इतर हॅचबॅक प्रकारच्या गाड्या याच प्लॅटफॉर्मवर तयार केल्या आहेत. आता त्यात ‘मारुती अल्टो’चीही भर पडणार आहे…

Advertisement

नव्या ‘अल्टो’तील फिचर्स

  • ‘अल्टो-2022’ ही एकदम फ्रेश डिझाईन व स्टायलिश अवतारात येणार आहे. त्यात मोठे ग्रिल, नवे बंपर नि मोठ्या टेलगेटचा समावेश आहे.
  • गाडीचे हेडलाईट आणि टेल लाईट्सही नवीन डिझाईनमध्ये असतील.
  • केवळ बाहेरूनच नाही, तर आतूनही बरेच बदल केले आहेत. त्यात नवा डॅशबोर्ड, सेंट्रल कन्सोल नव्या मॉडेलमध्ये देण्यात आला आहे.
  • सोबतच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, कीलेस एंट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी अशी हायटेक फीचर्स असतील.
  • जुन्या मॉडेलच्या तुलनेत सेफ्टी फीचर्स आणखी अपडेट असतील. याबाबत लवकरच माहिती दिली जाणार आहे.
  • या गाडीत K10C Dualjet 1.0 लिटर 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन 67 बीएचपी पॉवर आणि 89 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. सोबतच आणखी इंजिनचे ऑप्शन्सही दिले जाऊ शकतात.
  • मॅन्युअल गिअर व ऑटोमॅटिक गिअर, अशा दोन्ही प्रकारात गाडी असेल.
  • ही गाडी सीएनजी पर्यायातही उपलब्ध केली जाणार असल्याचे समजते

किंमत किती असणार..?

Advertisement

नवीन ‘अल्टो’ची किंमत 3.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असू शकते. ‘मारुती सुझुकी’ने ‘सेलेरियो’, ‘बलेनो’, ‘वॅगन-आर’ या गाड्यांचे नवे मॉडेल्स लाँच केले आहेत. ‘अल्टो’चा लूक समोर आल्याने यंदा दिवाळीपर्यंत ही गाडी लाॅंच होणार असल्याचे सांगितले जाते.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement