SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शालेय विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा..!

कोरोना संकटामुळे आता आरोग्याबाबत प्रत्येक जण दक्ष झालाय.. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेतली जाते.. सरकारही आता आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतंय. त्यासाठी अर्थसंकल्पात खास तरतूदही करण्यात आली होती..

खास करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत राज्य शासन अधिक सतर्क झालंय. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली.. त्याचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जाते..

Advertisement

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील सरसकट विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली जाणार असून, त्यांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत. राज्यातील शासकीय व निमशासकीय 81,556 शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली जाणार आहे..

Advertisement

सध्या टिव्ही, मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष निर्माण झाले आहेत. मात्र, अनेकदा मुलांसह पालकांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.. खूप त्रास जाणवू लागल्यावरच दवाखाना गाठला जातो.. मात्र, तोपर्यंत ही समस्या मोठी झालेली असते. विद्यार्थ्यांमधील दृष्टिदोष निवारणासाठी ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे..

625 लाखांच्या निधीस मान्यता

Advertisement

2021-22 या आर्थिक वर्षात राज्याच्या आरोग्य विभागाने नेत्रतपासणीसाठी 1500 लाखांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, सुधारित अंदाजानुसार 625 लाखांचा निधी निर्धारित केला आहे. या अनुदान वितरणास वित्त विभागाने मान्यता दिलीय..

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 625 लाखांचा निधी वितरीत केला जाणार आहे. त्यानुसार, लवकरच राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी केली जाणार असून, त्यांना मोफत चष्म्यांचेही वाटप केले जाणार आहे..

Advertisement

दरम्यान, या योजनेसाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी (कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य, पुणे) यांना आहरण व संवितरण अधिकारी व अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य), पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलं आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement