SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान योजनेबाबत पंतप्रधान मोदींचे ‘ट्विट’.., योजनेबाबत दिली महत्वाची माहिती..!

देशातील गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना योजना सुरु केली… देशातील 11.3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये, असे तीन हफ्त्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना मिळतात..

दरम्यान, आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना 10 हप्ते मिळाले असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 11वा हप्ता येणार आहे.. त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने बँकेत जाऊन या योजनेशी आधार कार्ड संलग्न करावं लागणार आहे..

Advertisement

सध्या पीएस किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याची चर्चा सुरु असतानाच, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता. 10) या योजनेबाबत एक ट्विट केलंय. देशातील किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो, त्यासाठी सरकारली दरवर्षी किती खर्च येतो, याबाबतची माहिती या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे..

ट्विटमध्ये काय म्हटलंय..?
शेतकऱ्यांचे आभार मानत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विट्मध्ये म्हटलंय, की “देशाचा शेतकरी जितका मजबूत असेल, तितका नवा भारत समृद्ध होईल.. पीएम किसान आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना नवऊर्जा देत आहेत. शेतकऱ्यांना उपयोगी पडतील, अशाच योजना केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जात असून, त्याचा मला आनंद आहे.”

Advertisement

तसेच आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची आकडेवारीही सादर केलीय. त्यात म्हटलंय की, पीएम किसान योजनेअंतर्गत 11 कोटी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 1.82 लाख कोटी रुपये वर्ग करण्यात आले. कोरोना संकटात शेतकऱ्यांच्या खात्यावर 1.30 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले.

Advertisement

‘ई-नाम’ (नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट)चा संदर्भ देत देशभरातील भाजी बाजारांचे ‘डिजिटल एकीकरण’ केले जात आहे. ‘ई-नाम’वर 1 कोटी 73 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, त्या माध्यमातून 1.87 लाख कोटी रुपयांचा व्यापार करण्यात आला असल्याचं नमूद केलं आहे..

दरम्यान, पीएम किसान योजनेचा 10 हप्ता जमा होऊन तीन महिने उलटले आहेत. अशा वेळी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केल्यानं, लवकरच 11व्या हप्त्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे बोलले जाते..

Advertisement

योजनेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया…

  • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • होम पेजवर ‘Farmer Corners’ ओपन करावा लागेल.
  • नवीन रजिस्ट्रेशनच्या ‘ऑप्शन’वर क्लिक केल्यावर एक फॉर्म ओपन होईल.
  • या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरुन तो सबमिट करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement