SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता बॅंकांचं काम सातही दिवस करता येणार..! रिझर्व्ह बॅंकेचा महत्वपूर्ण निर्णय..!

आर्थिक व्यवहाराबाबतच्या कामासाठी बॅंकेत जायचं म्हटलं, तर आधी कॅलेंडर पाहावं लागतं.. एखादी सुट्टी तर नाही ना.. याची खात्री केल्यावरच बॅंकेच्या दिशेनं पावलं पडतात.. मात्र, आता तसं होणार नाही.. आता तुम्ही कधीही बॅंकेत जाऊ शकाल.. नि तुमचं कामही अडून राहणार नाही..

वाचून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय.. आता आठवड्याचे सातही दिवस नि 24 तास बॅंका सुरु राहणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 ‘डिजिटल बँक युनिट्स’ (DBU) उघडण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार ‘डीबीयू’साठी ‘गाईडलाईन्स’ जारी करण्यात आल्या आहेत. या ‘गाईडलाईन्स’ देशातील सर्व व्यावसायिक बँकांना लागू असतील. मात्र, त्यात ग्रामीण बँका, पेमेंटस बँका व लोकल बँकांचा समावेश असणार नसल्याचे समजते..

‘डीबीयू’ अर्थात ‘डिजिटल बँकिंग युनिट्स’ म्हणजे नेमकं काय, त्याचा कसा नि कोणाला फायदा होणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘डीबीयू’बाबत..

‘आरबीआय’ने ‘डीबीयू’बाबत गाईडलाईन्स दिल्या आहेत. डिझाईन नि फॉरमॅटचा विचार केल्यास, ‘डीबीयू’ सामान्य बँकेसारखे नसेल. त्याचं डिझाईन विशिष्ट प्रकारचं असेल नि त्याद्वारे प्रामुख्याने ‘डिजिटल बँकिंग’ सेवांचा लाभ मिळणार आहे.. त्यासाठी प्रत्येक बँकेला ‘स्मार्ट उपकरणं’ बसवावी लागणार असल्याचं समजतं..

Advertisement

नागरिकांना ‘डीबीयू’मध्ये स्वत:च स्वत:चं खातं उघडता येणार आहेत. तसेच, बँकिंग संबंधित सर्व कामं ग्राहक स्वत: करू शकतील. ‘सेल्फ सर्व्हिस’सोबतच लोकांना मदत करण्यासाठी ‘डीबीयू’मध्ये कर्मचारीही असतील.. येथे बँकेसारखीच प्रत्येक सुविधा युजर्सला मिळेल. त्याला ‘डिजिटल’ आणि ‘ह्युमन’ टच असेल.

‘डीबीयू’मध्ये काय असणार..?

Advertisement
  • इंटरअॅक्टिव टेलर मशीन
  • इंटर अॅक्टिव्ह बँकर
  • सर्व्हिस टर्मिनल
  • टेलर
  • कॅश रिसायकलर्स इंट्रॅक्टिल डिजिटल वॉच
  • डॉक्युमेंटस अपलोडिंग
  • सेल्फ सर्व्हिस कार्ड
  • व्हिडीओ केवायसी

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement