SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नको तेच झालं… राज्यावर भारनियमनाचं संकट ओढावल; ‘एवढे’ तास राहणार लोड शेडींग

राज्यात विजेची मागणी वाढत असल्याने अख्या महाराष्ट्रात भारनियमन म्हणजे लोडशेडिंग केले जाणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांच्या संतापाचा पारा देखील वाढणार आहे. दरम्यान राज्यावर अनेक दिवसांपासून वीजेचे संकंट घोंघावत आहे. उन्हाळा लवकर सुरू झाल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असताना, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला लवकरच ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंगचा सामना करावा लागू शकतो.

आता महावितरणने लोडशेडिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. दरम्यान लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महावितरणला वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि लोडशेडिंग टाळण्यासाठी वीज खरेदीचे इतर पर्याय पाहण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात काही भागात दिवसा आठ तास तर काही भागात रात्री आठ तास वीज मिळणार आहे. संबंधीत वेळापत्रक हे एप्रिल 2022 पासून जून 2022 पर्यंत लागू असणार आहे. संबंधीत वेळापत्रक 1 एप्रिलपासून लागू झाले आहे. दरम्यान राज्यात सध्या 3,000 मेगावॅट ते 4,000 मेगावॅट विजेची तूट आहे. देशात सध्या कोळशाची कमतरता आहे. त्यामुळे वीजनिर्मीतीला अडथळा येत आहे.

ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंग टाळण्यासाठी, राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी येथे झालेल्या विशेष बैठकीत राज्य संचालित वीज वितरण कंपनी महावितरणला कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून 60 मेगावॉट तात्पुरते 5.50 ते 5.70 रुपये प्रति युनिट दराने घेण्यास परवानगी दिली आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून वीज खरेदीसाठी महावितरणचा पुढील अडीच महिन्यांचा खर्च 100 कोटी ते 150 कोटी रुपये असणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. राज्याच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement