SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोमय्या पिता-पुत्रांना बसला मोठा झटका; कोर्टाने दिला ‘तो’ निर्णय

मुंबई :

INS विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात किरीट सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पुर्ण झाली आहे आणि हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि पुत्र नगरसेवक निल सोमय्या (Niel Somaiya) या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya)  यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाकरे सरकारवर सातत्याने गंभीर आरोप करणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं होतं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, ते चौकशीला हजर राहू शकले नाहीत.

Advertisement

काय आहे प्रकरण?

किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Advertisement