SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महिन्याला गुंतवा फक्त 1000 रुपये आणि व्हा बक्कळ पैशावाले; समजून घ्या पूर्ण हिशोब

गेल्या काही काळापासून आपल्या देशात म्युच्युअल फंडातील (Investment in Mutual Fund) गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवण्याच्या एसआयपीच्या (What is SIP) पर्यायाने यातील गुंतवणुकीला अधिक चालना दिली आहे. कारण हा पर्याय सहज सोयीचा आहे. सप्टेंबर 2021 अखेर म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे 10 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे.

म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या चांगल्या परताव्यानेही (Returns in Mutual Fund) लोकांना आकर्षित केलं आहे. काही फंडांनी एका वर्षात 100 टक्क्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक म्युच्युअल फंडाकडे वळत आहेत.

Advertisement

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा म्युच्युअल फंडाद्वारे ऑफर केलेला गुंतवणूक पर्याय (Investment Option) आहे. यात मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक गुंतवणूक करण्याचा आणि दीर्घ कालावधीसाठी (Long Term) मोठी रक्कम जमा करण्याचा पर्याय देते. त्याचप्रमाणे तुम्ही दर महिन्याला फक्त 1000 रुपये वाचवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी फक्त SIP सुरू करणे आवश्यक आहे.

गुंतवणूकदाराने दरमहा 1000 रुपयांची SIP सुरू केली आणि त्यात 10-15 टक्के एसआयपी स्टेप-अप कायम ठेवला तर तो 25-30 वर्षांत करोडपती होऊ शकतो.

Advertisement

असा आहे हिशोब :-

जर एखादा गुंतवणूकदार दर महिन्याला 1000 रुपये महिना SIP सुरू केली आणि 10 टक्के स्टेप-अपसह 30 वर्षे गुंतवणूक केली तर त्याची एकूण गुंतवणूक 19,73,928 रुपये होईल. 15% वार्षिक रिटर्नसह, त्याला या रकमेवर 1,07,24,888 चा परतावा मिळेल. अशा प्रकारे त्याला मॅच्युरिटीवर 1.27 कोटी रुपये मिळू शकतात.

Advertisement

 

Advertisement