SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : राज्य सुरक्षा महामंडळात 25,000 रुपये पगाराची नोकरी; ‘असा’ करा अर्ज

मुंबई :

सध्याच्या काळ हा आर्थिक अस्थिरतेचा आहे. या काळात नोकरी मिळणे ही मोठी कठीण बाब होऊन बसली आहे. आता अशातच राज्य सरकारने आपल्या तरुणांसाठी एक जबरदस्त संधी उपलब्ध करून दिली आहे. आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई (Maharashtra State Security Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.

Advertisement

निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (MAHA Security Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant) यांना उमेदवार निश्चित झाल्यावर 25,000/- रुपये प्रतिमहिना पगार  मिळणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 एप्रिल 2022

Advertisement

अटी व नियम :-

  • कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक.
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण आवश्यक
  • संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • उत्तम कम्युनिकेशन स्किल्स, लोकल भाषा येणं अत्यंत आवश्यक

हे कम्युटर स्किल्स आवश्यक :- 

Advertisement
  • संगणक आणि टायपिंग गतीचे ज्ञान, व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC) आवश्यक
  • MS-CIT प्रमाणपत्र, 30 w.p.m मराठी टायपिंग, 40 w.p.m इंग्रजी टायपिंग, शॉर्टहँड स्पीड 80 w.p.m (इंग्रजी आणि मराठी)