SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज झाली वाढ; वाचा, काय आहेत नवे दर

मुंबई :

चीनमध्ये करोनाने पुन्हा थैमान घातले आहे. त्यामुळे करोनाची चौथी लाट धोकादायक असेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. यामुळे गुंतवणूकदार कमाॅडिटी बाजाराकडे वळाला आहे. तसेच आता या सगळ्या गोष्टींचा सोन्याच्या दरावर परिणाम होणार, हे निश्चितच आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 91 रुपयांनी महागले आहे. या तेजीमुळे आज सकाळी सोने 52162.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव (Silver Price Today) 158.00 रुपयांनी वाढला आहे. चांदी 67150.00 वर व्यवहार करत आहे.

सराफा बाजारातही अशीच परिस्थिती आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 53390 रुपयांवर उघडला असून आता 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) 48941 रुपयांवर आहे. याशिवाय 20 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 44,492 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटचा भाव 40443 रुपये आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 35593 रुपये झाला.

Advertisement

चांदीच्या बाजारातही वाढ झाली आहे. सराफा बाजारात आज एक किलो चांदीचा भाव 68690 रुपये होता. हे दर अजून काही दिवस वाढणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे.

Advertisement