SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज ठाकरे – वसंत मोरे यांच्यातील बैठक संपली, चर्चेनंतर मोरे यांनी घेतला मोठा निर्णय..!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेवरुन त्यांच्या पक्षातच मोठे नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र दिसत होतं. त्यावरुन मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज (ता. 11) मोरे यांना भेटीसाठी वेळ दिली होती.

मुंबईतील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज ही भेट झाली. वसंत मोरे यांनी सुरुवातीला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. मात्र, “तुमचे जे काही आक्षेप होते, ते तुम्ही थेट राज ठाकरे यांच्यासमोर का मांडले नाहीत..?” असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांनी केल्याचे समजते..

Advertisement

नंतर राज यांची भेट झाल्यावर त्यांनीही मोरे यांना हाच प्रश्न विचारत आपली नाराजी व्यक्त केली. ‘तुला थेट माझा अॅक्सेस असताना, सर्वात आधी माझ्याशी का बोलला नाहीस..?’ असा सवाल राज यांनी केला. त्यानंतर या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. वसंत मोरे यांनीही आपल्या अडचणी राज यांच्यासमोर मांडल्या.

Advertisement

वसंत मोरे काय म्हणाले..?
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, की “राज ठाकरे यांनी माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं.. त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं.. राज यांची उद्या (ता. 12) ठाण्यात सभा आहे. त्या सभेला ये… तिथं तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं ते म्हणाले.. या सभेला मी नक्की उपस्थित राहणार आहे..”

“मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन-तीन दिवसांपासून उलट-सूलट चर्चा सुरु होत्या.. मात्र, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, की मी ‘मनसे’त असून, ‘मनसे’तच राहणार.. मला अनेक पक्षांच्या ‘ऑफर’ होत्या, त्या सगळ्या ‘ऑफर’ आता संपल्या. उद्या राज यांची सभा असून, तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील..” असे मोरे म्हणाले.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement