SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गाडीची टाकी फुल करताय; ‘त्यापूर्वी’ जाणून घ्या पेट्रोलचे आजचे दर

देशात गेल्या 5 दिवसांपासून इंधन दरांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आजही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पेट्रोल-डिझेल च्या किमतींनी देशात उच्चांक गाठला आहे. देशात 22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचं सत्र सुरु होतं. गेल्या 21 दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय

Advertisement

मुंबई – 120.51 (पेट्रोल) | 104.77 (डिझेल)
दिल्ली – 105.41 (पेट्रोल) | 96.67 (डिझेल)
चेन्नई – 110.85 (पेट्रोल) | 100.94 (डिझेल)
कोलकाता – 115.12 (पेट्रोल) | 99.83 (डिझेल)
हैद्राबाद – 119.49 (पेट्रोल) | 105.49 (डिझेल)
कोलकाता – 115.12 (पेट्रोल) | 96.83 (डिझेल)
बंगळुरू – 111.09 (पेट्रोल) | 94.79 (डिझेल)

Advertisement