SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलग 4 पराभवानंतर थेट नीता अंबानींने केला टीम मुंबई इंडियन्सला फोन; म्हणाल्या…

मुंबई :

आयपीएलचे सर्वाधिक पाच विजेतेपद मिळवणाऱ्या टीम मुंबई इंडियन्सला तरी काय असा प्रश्न फक्त त्यांच्या चाहत्यांना नाही तर प्रतिस्पर्धी संघ आणि चाहत्यांना देखील पडला आहे. काल शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबईवर सहज विजय मिळवला. रोहित शर्मा आणि टीमचा आयपीएल २०२२मधील हा सलग चौथा पराभव ठरलाय.

Advertisement

दरम्यान आता टीममध्ये थोडी निराशा असताना एक चांगली गोष्ट घडली आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये उत्साह संचारला आहे. आयपीएलमध्ये झालेल्या सलग चौथ्या पराभवानंतर थेट संघाच्या मालक असणाऱ्या निता अंबानी यांचा खेळाडूंना फोन आलेला आहे.

आपल्या संघातील खेळाडूंशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, मला तुमच्या सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला आशा आहे की आपण पुढे जाऊ. यापुढे आपण फक्त पुढे जाऊ शकतो. आपल्याला स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज की आपण जिंकणार आहोत.

Advertisement

नीता अंबानी यांचा खेळाडूंशी संवाद चालू असतानाचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘आपण एकमेकांसोबत राहिलो तर विजय नक्कीच मिळवू. तोपर्यंत तुम्हाला जे काही हवे आहे, त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असले. कृपया एकमेकांवर आणि स्वत:वर विश्वास ठेवा’, असेही पुढे बोलताना त्या म्हणाल्या.

Advertisement