SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 11 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ शिमरॉन हेटमायरच्या 59 धावांच्या जोरावर राजस्थानचे लखनौला 166 धावांचे आव्हान, राजस्थान रॉयल्सचा 3 धावांनी विजय; लखनौ सुपरजायंट्सच्या 20 ओव्हरमध्ये 162/8 धावा

✒️ ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी काल रात्री मुंबई पोलिसांची झाडाझडती, सीसीटीव्ही, रजिस्टर तपासणी, सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती गोळा होणार

Advertisement

✒️ पुणे मनसेचे नेते वसंत मोरेंना अखेर राज ठाकरे भेटणार; आज सकाळी 11 वाजता ‘शिवतीर्थ’वर भेट होणार, पुन्हा खळबळ होण्याची शक्यता

✒️ परिवहन मंत्री अनिल परब यांची आज दुपारी साडे तीन वाजता महत्वाची तातडीची बैठक, बैठकीला वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित

Advertisement

✒️ होंडा आणि जनरल मोटर्स लॉन्च करणार स्वस्त ‘इलेक्ट्रिक कार, उत्तर अमेरिकेत याची विक्री 2027 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा; Chevrolet Equinox EV पेक्षा किंमत कमी असणार

✒️ मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल:म्हणाले – युती आम्ही नव्हे भाजपने तोडली, अमित शाह यांनी वचन मोडलं; भाजपला सोडले म्हणजे हिंदूत्व सोडले असे नाही

Advertisement

✒️ महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला कोल्हापूर महाविकास आघाडीकडून 5 लाखाचे बक्षीस जाहीर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने बक्षीस न मिळाल्याची व्यक्त केली होती खंत

✒️ शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलन प्रकरणी गावदेवी पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांची बदली, 2 दिवसांपूर्वीच विभागातील डीसीपी गुप्ता यांचीही झाली होती बदली

Advertisement

✒️ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीला अपघात, ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह तिघे जण गंभीर जखमी

✒️ वीज वितरण क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल, आयपीपीएआय कडून तब्बल सात पुरस्कारांनी महावितरणचा झाला गौरव
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement