SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘कपील शर्मा शो’मधील कलाकार करतोय चहाच्या टपरीवर काम.. व्हिडीओ पाहून चाहते हैराण..!

‘द कपील शर्मा शो’.. छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय शो..! विकेंडला लोकांना पोट धरुन हसायला लावणारा हा शो लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या शोच्या चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.. या ‘शो’मुळेच कपील शर्मासह अन्य कलाकारांना ग्लॅमर मिळाले.. पैसा नि प्रसिद्धी मिळाली..

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी हा कपील शर्मा चर्चेत आहे.. नुकतीच एक बातमी समोर आली असून, त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओत ‘द कपिल शर्मा शो’मधील एक प्रसिद्ध नट रस्त्याच्या कडेला चहा विकताना दिसत आहे..

Advertisement

हा नट दुसरा-तिसरा कोणी नसून तो आहे, विनोदी अभिनेता सुनील ग्राेव्हर.. कपील शर्मासोबत सुनील ग्रोव्हरचे भांडण चांगलेच गाजले होते. त्यानंतर सुनीलसह अन्य काही कलाकारांनी कपीलच्या शोमधून काढता पाय घेतला होता.. आता तोच सुनील रस्त्याच्या कडेला चहा बनवताना दिसल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय..

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

Advertisement

सोशल मीडियावर सुनील कायम अॅक्टिव्ह असतो.. वेगवेगेळ्या पोस्ट तो सतत करीत असतो.. नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात तो रस्त्याच्या कडेला चहा बनवताना दिसत आहे. त्याला तसे पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Advertisement

व्हिडीओत नेमकं काय..?

आपल्या ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवर सुनील ग्रोव्हरने हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात तो गढवालमधील एका टी-स्टॉलवर चहा बनवताना दिसतोय. दुकानाची मालकीण त्याच्याकडे पाहत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. सुनीलची चहा बनवण्याची पद्धत चाहत्यांच्या भलतीच पसंतीस उतरलीय. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिल्याचे दिसते.

Advertisement

चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हटलंय, की ‘तुम्ही याच कारणांमुळे माझे फेव्हरेट नट आहात’. अनेकांना सुनीलचा साधेपणा भावल्याचे दिसते.. ‘मी तुमच्या इतका कोणाचाच फॅन नाही..’ असं एकानं लिहिलंय.. आणखी एकानं मी तुमच्या कॉमेडीला खूप मिस करीत असल्याचे लिहिलंय..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement