SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘असे’ पालक ठरतात आपल्याच मुलांचे शत्रू.., ‘चाणक्य नीति’त काय म्हटलंय..?

आचार्य चाणक्य.. महान अर्थतज्ज्ञ नि रणनीतिकार.. त्यांनी नीतिशास्त्राची रचना केली, त्यालाच ‘चाणक्य नीति’ म्हणून ओळखले जाते.. जीवनाचे सार या नीतिशास्रात आहे.. या नीतिशास्राद्वारे, आपल्या अनुभवांद्वारे आचार्य चाणक्य यांनी समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आजच्या काळातही लागू होते..

आचार्य चाणक्यांनी मुलांच्या संगोपनावर विशेष लक्ष वेधलंय. पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी, मुलांवर वाईट संस्कार होऊ नये, यासाठी काय करायला हवं, याबाबत चाणक्य नीतिमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

मुलांना चांगलं शिक्षण द्या..
‘चाणक्य नीति’च्या दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकात आचार्य चाणक्य लिहितात, की ज्ञानी पुरुषांनी आपल्या मुला-मुलींमधील चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिलं ​​पाहिजे. लहानपणी ज्या पद्धतीचं शिक्षण मुलांना मिळतं, त्याच पद्धतीनं त्यांचे जीवनही विकसित होतं.

पालकांनी मुलांना शिक्षण दिलं नाही, तर अशिक्षित मुलाला विद्वानांच्या गटात बसता येत नाही, त्याला नेहमी तुच्छतेची वागणूक मिळते. जसा पांढरा बगळा पांढऱ्या हंसांमध्ये बसला, तरी हंस बनू शकत नाही, त्याचप्रमाणे अशिक्षित माणूस सुशिक्षित लोकांमध्ये बसून शोभा वाढवू शकत नाही, असं अकराव्या श्लोकात लिहिले आहे.

Advertisement

अति लाड नको..
बाराव्या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात, की अति लाडाने पुत्रांमध्ये अनेक दोष निर्माण होतात. मुलाला वेळीच आवर घातला, त्याला शिक्षा केली, तर त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते. पुत्र नि शिष्यांचे जास्त लाड करू नयेत, त्यांना शिक्षा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

चुकीबद्दल शिक्षा हवीच
आई-वडिलांच्या अति प्रेमामुळे मुलांच्या दोषांकडे लक्ष जात नाही. त्यामुळे मुलांनी काही चुकीचे काम केलं, तरी त्यांना अगोदरच समज देऊन त्या चुकीच्या कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या मुलाने चूक केल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करून त्याचे लाड करणे योग्य नाही. गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षाही झाली पाहिजे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement