SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज संपूर्ण देशभर श्रीराम नवमीचा उत्साह, जाणून घ्या रामनवमीचा मुहूर्त, व्रत नि पूजाविधी..!

आज राम नवमी.. भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीरामांचा जन्मदिन..हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक.. भारतात दरवर्षी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.. गेल्या दोन वर्षांपासून या सणावर कोरोनाचे सावट होते. आता हे सावट हटलंय.. त्यामुळं यंदा हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा होणार, हे नक्की..

चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते.. यानिमित्ताने देशभरातील राम मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.. श्रीराम नवमीची तिथी, मुहूर्त, पूजा विधी नि या सणाचे महत्व थोडक्यात समजून घेऊ या..

श्रीराम नवमीचा शुभ मुहूर्त
– चैत्र शुद्ध नवमी प्रारंभ – 9 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 24 मिनिटे
– चैत्र शुद्ध नवमी समाप्ती – 11 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 15 मिनिटे
श्रीराम पूजनाचा मुहूर्त – 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 06 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 39 मिनिटे

राम नवमीचा पूजाविधी
राम नवमी तिथी प्रारंभ झाल्यावर नेहमीप्रमाणे सुचिर्भूत व्हावे. प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. श्रीराम पूजनाचा संकल्प करावा. श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा. नंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद-कुंकू, चंदन, फुले अर्पण करावीत. नंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. आरती करावी. श्रीरामांना नमस्कार करावा.

पूजेनंतर रामचरितमानस, रामरक्षा, शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे. व्रत संकल्प केलेल्या भाविकांनी दिवसभर केवळ फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी. राम नवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होत असल्याचे मानले जाते.

Advertisement