SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टीव्हीएस ज्युपीटर’ घ्यावी, की ‘सुझुकी अ‍ॅक्सेस’..? किमतीपासून मायलेजपर्यंत कोण वरचढ..?

इंधन दरवाढीमुळे नागरिक आता जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. शिवाय आपली गाडी स्टायलिशही दिसावी, अशीही नागरिकांची अपेक्षा असते.. आता स्कूटर सेगमेंटमध्ये 100 पासून थेट 160 सीसीपर्यंतच्या स्कूटर्स सहज उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते.

सध्या भारतीय बाजारात दोन स्कूटरची मोठी चलती आहे. त्या म्हणजे, ‘टीव्हीएस ज्युपीटर 125’ (TVS Jupiter 125) नि ‘सुझूकी अ‍ॅक्सेस 125’ (Suzuki Access 125)… स्टायलिश नि मायलेज देणाऱ्या स्कूटर शोधत असाल, तर या दोन लोकप्रिय स्कूटर्स पाहायला हरकत नाही. या दोन्ही स्कूटर्स नवीन अपडेटसह लाँच करण्यात आल्या आहेत. दोन्ही स्कूटरची किंमत, मायलेज, वैशिष्ट्ये जाणून घेऊ या…

Advertisement

टीव्हीएस ज्युपीटर 125

‘टीव्हीएस’ कंपनीची ही एक ‘स्टायलिश’ त्याच बरोबर चांगले मायलेज देणारी ही स्कूटर आहे. कंपनीने अलिकडेच फिचर्स, स्पेसिफिकेशन्ससह ही स्कूटर अपडेट केली असून, तीन व्हेरियंटसह बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..

Advertisement
  • ‘टीव्हीएस ज्युपीटर 125’ मध्ये 124.8 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 8.3 पीएस पॉवर, 10.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
  • ‘टीव्हीएस ज्युपिटर’ लिटरमागे 64 किमी मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा असून, हे मायलेज ‘एआरएआय’ (ARAI)ने प्रमाणित केलेय.
  • स्कूटरच्या पुढील चाकाला ‘डिस्क ब्रेक’, तर मागील चाकामध्ये ‘ड्रम ब्रेक’ आहे. सोबतच ‘अलॉय व्हील’ आणि ‘ट्यूबलेस टायर्स’चे कॉम्बिनेशन दिले आहे.
  • किंमत – 75,625 (एक्स-शोरूम), टॉप व्हेरिएंटमध्ये 82,575 रुपये.

सुझुकी अ‍ॅक्सेस 125

सुझुकी कंपनीने नुकतीच ही स्कूटर नवीन हाय-टेक फिचर्ससह अपडेट केलीय. या स्कूटरचे 6 व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत. या स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..

Advertisement
  • स्कूटरमध्ये 124 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 8.7 पीएस पॉवर व 10 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
  • स्कूटरच्या पुढच्या चाकाला ‘डिस्क ब्रेक’, तर मागील चाकामध्ये ‘ड्रम ब्रेक’ आहे. सोबत ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील जोडले आहेत.
  • ‘सुझुकी अ‍ॅक्सेस 125’ स्कूटर 57.22 किमी मायलेज देते, हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
  • किंमत 75,600 (एक्स-शोरूम), टॉप व्हेरियंटमध्ये 84,800 रुपये.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement