SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दारुची दुकाने, बारला ‘ही’ नावे देता येणार नाहीत, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!

सर्वधर्मीय देवी-देवता, राज्यातील गड-किल्ले, तसेच देशातील राष्ट्रपुरुष, महापुरुषांविषयी प्रत्येक नागरिकाच्या मनात एक आस्था असते. चुकीच्या ठिकाणी अशा महनीय व्यक्तींच्या, स्थळांच्या नावांचा वापर झाल्यास, एकप्रकारे हा त्यांचा अपमान असतो.. देवीदेवता, राष्ट्र-पुरुष व गड-किल्ल्यांची विटंबना केल्यासारखे होते. समाजाच्या भावना दुखावल्या जातात. सामाजिक-धार्मिक वातावरण दूषित होते.

राज्यातील दारुची दुकाने, बारला अनेक ठिकाणी देवी-देवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-किल्ल्यांची नावे दिल्याचे पाहायला मिळते.. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जात असल्याची बाब निर्दर्शनास आल्याने ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतलाय..

Advertisement

सरकारचा नवा आदेश
ठाकरे सरकारच्या नव्या नियमानुसार, राज्यात यापुढे दारुची दुकाने, तसेच बारला देवी-देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती, तसेच गड-किल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी घातलीय. तसेच सध्या दारुची दुकाने व बारला दिलेली नावेही आता बदलावी लागणार आहेत. त्यासाठी ठाकरे सरकारने 30 जूनपर्यंत मुदत दिली आहे.

यादीत किती नावे..?
राज्याच्या गृह विभागानं याबाबतचा आदेश काढलाय. त्यात राज्यातील दारुची दुकाने व बारला कोणकोणत्या राष्ट्रपुरुषांची व गड-किल्ल्यांची नावे देऊ नयेत, याची यादी दिली आहे. या यादीत 56 राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्ती, तसेच राज्यातील 105 गड-किल्ल्यांच्या नावांचा समावेश आहे.

Advertisement

दारुच्या दुकानांना, तसेच बारला देवी-देवता, राष्ट्रपुरुष व गड-किल्ल्यांची नावे दिलेली असल्यास, ती 30 जूनपर्यंत बदलण्याच्या स्पष्ट सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.

राज्यातील ज्या आस्थापनांमध्ये मद्यविक्री वा मद्यपान केले जात असेल, अशा ठिकाणी सर्वधर्मीयांच्या देवदेवता, धार्मिक श्रद्धास्थाने, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्तींची नावे आता देता येणार नाही. राज्यातील गड-किल्ले, राष्ट्रपुरुष, तसेच सर्वधर्मिय श्रद्धांस्थानांचा आदर करणे, सामाजिक सलोखा राखण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे ठाकरे सरकारच्या या आदेशात नमूद करण्यात आले आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement