SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुगलची मोठी कारवाई : तुमच्या मोबाईलमध्येही आहेत ‘हे’ App; तातडीने करा डिलीट, अन्यथा…

मुंबई :

गुगल नेहमीच अयोग्य मार्गाने काम करणाऱ्या, डेटा चोरी करणाऱ्या तसेच युजर्सच्या माहितीला सेफ न ठेवणाऱ्या अ‍ॅप्सला हटवत असते. आताही गुगलने अशीच कारवाई केली आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोरवरून आपल्या 6 अ‍ॅप्सला हटवले आहे. या अ‍ॅप्सद्वारे फोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होत होता. या सर्व अ‍ॅप्समध्ये Sharkbot bank stealer मॅलवेयर होता. हा मॅलवेयर लोकांच्या बँकेची माहिती चोरी करतो. तुमचा खासगी डेटा चोरी करून हॅकर्सद्वारे ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे काढले जातात.

Advertisement

हाच धोका ओळखत गुगलने याबाबत एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. गुगलने तातडीने हे Apps प्ले स्टोरवरून हटविले आहे. तसेच तुम्हीही अशी धोकादायकी अ‍ॅपचा वापर करत असाल तर त्वरित डिलीट करा. कारण, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे.

ही आहेत ती धोकादायक अ‍ॅप्स:- 

Advertisement
  • Atom Clean-booster Antivirus
  • Antivirus super cleaner
  • Alpha antivirus cleaner
  • powerful cleaner antivirus
  • center security antivirus
  • Center security antivirus

एका रिसर्च कंपनीच्या माहितीनुसार या सर्व अ‍ॅप्समध्ये Sharkbot मॅलवेयर होता. हा यूजर्सच्या फोनमध्ये “droppers” अ‍ॅप डाउनलोड करत असे व याद्वारे यूजर्सची खासगी माहिती चोरी केली जात होती. या अ‍ॅप्सला Zbynek Adamcik, Adelmio Pagnotto आणि Bingo Like Inc सारख्या कंपन्यांना डेव्हलप केले होते. गुगलने प्ले स्टोरवरून या अ‍ॅप्सला डिलीट केले असले तरीही अनेक थर्ड पार्टी स्टोरवर हे अ‍ॅप्स अद्याप उपलब्ध आहेत.

Advertisement