SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Electric Car खरेदीचा विचार करताय? ‘या’ बँकेकडून मिळतेय आकर्षक ऑफर

मुंबई :

दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. पेट्रोल किंवा डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा दैनंदिन रनिंग खर्च व मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो. तसेच सामान्य कारच्या तुलनेत ईव्हीचा मेंटेनन्स खर्च सुमारे ५०% कमी असतो त्यामुळे आता लोकांचा ओढा साहजिकच इलेक्ट्रिक वाहनांकडे दिसत आहे. जर तुम्हीही Electric Car खरेदीचा विचार करत आहात आणि तुमचे बजेट कमी पडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आणली आहे.

Advertisement

देशात पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपारिक इंधानाचे दर गगनाला भिडल्याने इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मागणी वाढतेय. अशात आता स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर स्वस्त आणि सुलभ कर्ज देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिले ग्रीन कार कर्ज सुरू केले होते. यामध्ये, व्याज दर सध्याच्या वाहन कर्ज योजनेच्या दरापेक्षा 20 बेसिक पॉइंट कमी आहे. SBI वेबसाइटनुसार, ऑन-रोड किमतीच्या 90 टक्के ते 100 टक्के लोन निवडक मॉडेल्सवर उपलब्ध असतील. ग्रीन कार कर्जाचे व्याज दर 7.05 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत आहेत.

Advertisement

जर तुम्हाला एसबीआयकडून ग्रीन कार लोन घ्यायचे असेल, तर यासाठी तुम्ही आयडी प्रूफमध्ये व्होटर आयडी, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता. यासोबतच पत्त्याच्या पुराव्यामध्ये रेशनकार्ड, वीजबिल आवश्यक असेल. तसेच, तुम्हाला मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो देखील द्यावे लागतील.

जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतचा करही वाचवू शकता. जे लोक कर्जावर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात ते कलम 80EEB अंतर्गत कर्जासाठी भरलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीसाठी पात्र असतील.

Advertisement