SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी: कोरोना लसीच्या किंमतीत झाली ‘एवढी’ मोठी कपात; जाणून घ्या नव्या किंमती

मुंबई :

कोरोनाचा धोका देशात अद्यापही कायम आहे. अशातच एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. देशातील दोन मोठ्या कोरोना लस निर्मात्या कंपन्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या किंमतीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट केली आहे.

Advertisement

आता या दोन्ही लसी खासगी लसीकरण केंद्रावर फक्त 225 रुपयांमध्ये मिळणार आहे. या लसींच्या किंमतीबाबत दोन्ही कंपनीच्या प्रमुखांनी ट्विट करत माहिती दिली. दरम्यान कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटपासून बचाव व्हावा यासाठी 10 एप्रिलपासून देशातील वयवर्षे 18 हुन अधिक असलेल्या लोकसंख्येच्या गटासाठी कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्वीच्या किंमती व आजच्या किंमती :-  कोविशिल्ड लसीची किंमत आधी 600 रुपये तर कोव्हॅक्सिनची किंमत 1200 रुपये प्रति डोस इतकी होती. या लसी आता 225 रुपयांना मिळणार आहे.

Advertisement

सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, आम्हाला ही घोषणा करताना आनंद होत आहे , केंद्र सरकारसोबत चर्चा केल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्ड लसीची किंमत 600 रुपयांवरून 225 रुपये प्रति डोस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत बायोटेकच्या सुचित्रा इल्ला यांनी म्हटले आहे की, आम्ही, 18+ लोकसंख्येच्या गटासाठी Precaution Dose अर्थात बुस्टर डोस उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, आम्ही खासगी रुग्णालयांसाठी COVAXIN ची किंमत 1200 रुपयांवरुन 225 रुपये प्रति डोस इतका करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

सर्वच खासगी लसीकरण केद्रांवर बुस्टर डोस उपलब्ध असणार आहे. तर तेच पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी सरकारी लसीकरण केंद्रांवर विनाशुल्क लसीकरण सुरू राहील. याव्यतिरिक्त सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी विनामूल्य लसीकरण सुरू राहील.

Advertisement