SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रासमोर नवं संकट उभे, ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे होणार हाल..!

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी बातमी आहे.. उन्हाच्या झळा तिव्र होत असताना, महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे.. हे संकट म्हणजे, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण झालीय.. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागासह शहरी नागरिकांनाही लोडशेडिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. राज्यातील अनेक वीज निर्मीती केंद्रावर दोन-तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. सध्या राज्यात 28,700 मेगावॅट विजेची मागणी असून, ती 30 हजार मेगावॅटपर्यंत जाऊ शकते.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर विजेचे संकंट घोंगावत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वीज कापली जात असून, वीजबिल भरण्याचे आवाहन राज्य सरकारने केलं आहे. उन्हाळा लवकर सुरू झाल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झालीय.

राज्यात सध्या 3,000 मेगावॅट ते 4,000 मेगावॅट विजेची तूट आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी महावितरणला कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून 60 मेगावॉट वीज तात्पुरत्या काळासाठी 5.50 ते 5.70 रुपये प्रति युनिट दराने घेण्यास राज्य मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे.

Advertisement

‘लोडशेडिंग’चं वेळापत्रक जारी

सध्या गुजरातमध्ये आठवड्यातून एक दिवस वीज बंद केली जाते. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच ‘ब्लॅक आउट’ किंवा ‘लोडशेडिंग’चा सामना करावा लागू शकतो. अशी वेळ येऊ नये, यासाठी महावितरणने (Mahavitaran) आतापासूनच ‘लोडशेडिंग’चं वेळापत्रक जारी केलंय.

Advertisement

राज्य सरकारच्या मुख्य अभियंत्यांनी भारनियमाची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार दिवसा 8 तास किंवा रात्री 8 तासांची वेळ निश्चित करण्यात आलीय. यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढण्यात आलं आहे. संबंधित वेळापत्रक 1 एप्रिलपासून लागू झालं असून, जून 2022 पर्यंत लागू असेल, असं सांगण्यात आलं..

दरम्यान, राज्यात भारनियमन वाढणार असले, तरी या वाढत्या भारनियमनाचा बोजा उद्योग-व्यवसायावर टाकला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

 

Advertisement