SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, अनिल परब यांचे महत्वपूर्ण वक्तव्य..!

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाला परवा (ता. 8) गालबोट लागले.. काही कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ घरावर मोर्चा काढला.. तेथे दगडफेक करण्यात आली.. काहींनी चपला भिरकावल्या..

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला (ST strike) हिंसक वळण लागल्याने, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं.. विशेष म्हणजे, विरोधी पक्ष भाजपनेही या प्रकाराचा निषेध केला. पोलिसांनी शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, या कर्मचाऱ्यांना अटक केली.

Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसले, तरी कर्मचाऱ्यांच्या इतर सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, तसेच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले होते..

हायकोर्टाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनीही जल्लोष केला. मात्र, अचानक कुठेतरी माशी शिंकली नि परवा (शुक्रवारी) काही एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल केला… या आंदोलनामागे कुणाचा तरी हात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. त्याच वेळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठा निर्णय घेतला आहे..

Advertisement

परिवहन मंत्री काय म्हणाले..?

माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, की “येत्या 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जाणार नाही.”

Advertisement

पवार यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना आता सेवेत घेतले जाणार नाही.. तसेच, 22 तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाही, तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण करता येईल का, याचाही विचार केला जाईल. बससेवा सुरु करण्यासाठी बस आगारांनी सगळ्या बसेसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सुरू करण्यासाठी पूर्ण सज्ज आहे,” असे मंत्री परब यांनी स्पष्ट केलं..

पडद्यामागे वेगवान घडामोडी..
दरम्यान, शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. गामदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना हटवण्यात आलं. त्याआधी पोलिस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज (ता. 10) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement