SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोनम कपूरच्या घरावर दरोडा.. दागिन्यांसह कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीवर डल्ला..!

बाॅलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.. सुपरस्टार अनिल कपूर यांची कन्या अभिनेत्री सोनम कपूर हिच्या घरात जबरी चोरी झालीय.. चोरांनी घरातून तब्बल 1.41 कोटी रुपयांच्या दागिन्यांसह मोठी रोख रक्कम लंपास केलीय. याबाबत सोनम कपूरच्या सासूच्या फिर्यादीवरुन तुघलक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काही वर्षापूर्वीच सोनम कपूरचा विवाह तिचा मित्र आनंद आहुजा यांच्यासोबत झाला होता. नवी दिल्लीतील अमृता शेरगिल रोडवर आनंद आहुजा यांचे वडिल हरिश आहुजा, आई प्रिया आहुजा व आजी सरला आहुजा हे राहतात.. आनंद आहुजा हे ‘कॅलिफोर्निया’मध्ये राहतात. वारंवार ते इथे येत असतात. आहुजा कुटुंबाची ‘साई एक्सपोर्ट्स’ नावाची कपड्यांची कंपनी आहे.

Advertisement

तक्रारीत काय म्हटलंय..

सरला आहुजा यांनी व्यवस्थापक रितेश गौरा यांच्यासोबत 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती. मात्र, अत्यंत हायप्रोफाईल प्रकरण असल्याने पोलिसांनी आतापर्यंत ते गुप्त ठेवले होते. मात्र, नुकतेच हे प्रकरण समोर आले.

Advertisement

सरला आहुजा यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी दोन वर्षांपूर्वी अगदी तपासून कपाटात कोट्यवधी रुपयांचे दागिने ठेवले होते. मात्र, 11 फेब्रुवारी रोजी कपाट तपासले असता, त्यातील कोट्यवधी रुपयांचे दागिने व रोख रक्कम गायब झाली होती. या चोरीच्या तपासासाठी नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध पथके तयार केली आहेत.

नोकरांची कसून चौकशी
सोनम कपूरच्या सासरी 25 नोकर, 9 केअर टेकर, ड्रायव्हर, माळी व इतर कर्मचारी काम करतात. पोलिस आता या सर्वांची कसून चौकशी करीत आहेत. क्राइम टीम व्यतिरिक्त ‘एफएसएल’ टीम पुरावे गोळा करीत आहे. गेल्या एक वर्षापासूनचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज पोलिस तपासत आहेत. मात्र, अजूनही पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे लागलेले नाहीत.

Advertisement

दरम्यान, सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.. काही दिवसांपूर्वीच तिने फोटो पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती. पती आनंद आहुजासोबत तिने हे फोटो पोस्ट केले होते. सोनमच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट नि लाईक्सचा वर्षाव झाला होता..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement