SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ 2 बड्या बँकांला मोठा झटका; ‘त्यामुळे’ RBI ने केली मोठी कारवाई

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) म्हणजेच आरबीआयने कारवाईचा तडाखा सुरु केला आहे. नियमात न राहून काम करणाऱ्या बँकांना आरबीआयने कैचीत पकडले आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील जवळपास 10 बँकांवर आरबीआयने कारवाई केली होती. नव्या आर्थिक वर्षातही आता 2 बड्या बँकांनाही आरबीआयने झटका दिला आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने आज नियमांच्या अंमलबजावणीतील तृटींसंदर्भात अॅक्सीस बँकेला 93 लाखांचा व आयडीबीआय बँकेला 90 लाखांचा दंड ठोठावला आहे. कर्जे देणे, दंडआकारणी, केवायसी सेवा व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक नसणे यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अॅक्सीस बँकेवर ही कारवाई केली.

अॅक्सिस बँकेने स्टॉक ब्रोकर्सना दिलेल्या इंट्राडे सुविधांच्या संदर्भात विहित मार्जिन न राखून काही नियमांचे उल्लंघन केले आहे तर सावकाराने विलंबाने फसवणुकीची तक्रार केली. त्याच वेळी, 5 कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या फसवणुकीसंबंधी फ्लॅश अहवाल विलंबित आणि RBI कडे सादर करण्यात आला आणि कॉर्पोरेट्ससाठी सुट्टी आणि डेटा ऍक्सेस नियंत्रणांवर वेळेचे निर्बंध लागू करण्यात अयशस्वी झाले.

Advertisement

मात्र या बँकांचे काही व्यवहार किंवा ग्राहकांशी केलेले करार चुकीचे आहे, असा या कारवाईचा अर्थ नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

Advertisement