SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम बदलली, स्टाईल नाही! ‘या’ खेळाडूनं पंजाबच्या तोंडचा घास हिरावला

मुंबई :

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 16 वा सामना पंजाब विरुद्ध गुजरात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने सामना जिंकला. अत्यंत रोमांचक हा सामना झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत पंजाब सामना जिंकणार हे निश्चित असताना शेवटच्या 2 बॉलमध्ये समीकरण बदललं. गुजरातचा स्टार खेळाडूचं शतक हुकलं पण त्याने टीमला विजय मिळवून दिला. त्याने शेवटच्या दोन बॉलमध्ये अशी कामगिरी केली की बाजीच पलटली.

Advertisement

शेवटच्या 2 बॉलला 12 रनची गरज असताना राहुल तेवातियाने (Rahul Tewatia) ओडियन स्मिथला 2 सिक्स मारत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. आयपीएलच्या या मोसमात गुजरातने अजूनपर्यंत एकही मॅच गमावलेली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमधील ऑल राऊंडर असलेल्या राहुल तेवातियाचे (Rahul Tewatia) नाव 2020 पर्यंत फार कुणाला माहिती नव्हते. त्यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये तेवातियानं राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सुरूवातीच्या संथ खेळीनंतर एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावले होते. गुजरात आयपीएलच्या या हंगामात विजयाची हॅटट्रिक करणारा आणि आतापर्यंत एकही पराभव न स्विकारणारा एकमेव संघ ठरला आहे. या विजयासह ते गुणतक्त्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

Advertisement

राहुल तेवातिया शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला. त्यावेळी मॅच पंजाबच्या बाजूनं झुकली होती.  शेवटच्या 2 बॉलवर 12 रनचं अवघड आव्हान त्याच्यासमोर होतं. तेवातियानं ओडियन स्मिथला 2 सिक्स मारत गुजरातला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सनं यंदा 9 कोटींमध्ये तेवातियाला खरेदी केले आहे. फ्रँचायझीचा हा विश्वास त्यानं पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये सार्थ ठरवला. यापूर्वी फक्त महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) केलेल्या रेकॉर्डची बरोबरी तेवातियानं केली आहे.

Advertisement