SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फ्लिपकार्ट’च्या नव्या सेवेचा प्रारंभ, आता ‘या’ही वस्तू घरबसल्या स्वस्तात मिळणार..!

‘फ्लिपकार्ट’.. ‘ई काॅमर्स’ क्षेत्रातील एक मोठं नाव.. ग्राहकांना ‘स्वस्तात मस्त’ वस्तू खरेदी करण्याचं हक्काचं ठिकाण… त्यासाठी ‘फ्लिपकार्ट’कडून अनेकदा ‘सेल’ जाहीर केले जातात. त्यात ग्राहकांना विविध वस्तूंवर ‘बंपर डिस्काऊंट’ही मिळतो.. मात्र, आता ‘फ्लिपकार्ट’ एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे..

‘वॉलमार्ट’च्या मालकीच्या ‘फ्लिपकार्ट’ने (Flipkart) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ही कंपनी ‘आरोग्य सेवा’ क्षेत्रात उतरणार आहे. त्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ने नुकतंच एक नवीन ‘आरोग्य अ‍ॅप’ लाँच केलं. ‘फ्लिपकार्ट हेल्थ प्लस’ (Flipkart Health+) असं या अ‍ॅपचं नाव आहे.

Advertisement

आतापर्यंत नागरिकांना ‘फार्मसी’, ‘नेटमेड्स’, ‘अपोलो-24/7’ यांसारख्या कंपन्यांच्या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन औषधे पुरवली जात होती. मात्र, आता या कंपन्यांसमोर ‘फ्लिपकार्ट’च्या रुपानं एक तगडं आव्हान उभं राहिलंय..

कुठे मिळणार आरोग्य सेवा..?
‘फ्लिपकार्ट’ कंपनीच्या माहितीनुसार, देशातील 20 हजारांहून अधिक पिनकोडवर ग्राहकांना आरोग्य सुविधा दिली जाणार आहे. सोबतच 500 हून अधिक औषध विक्रेते या ‘नेटवर्क’शी जोडले जातील. नागरिकांवर लवकरात लवकर नि स्वस्तात औषधे पाठवली जातील.

Advertisement

औषधे मागवण्यासाठी ग्राहकांना ‘फ्लिपकार्ट हेल्थ प्लस’ या अ‍ॅपवर डाॅक्टरांनी दिलेले औषधाचं ‘प्रिस्क्रिप्शन’ अपलोड करावं लागेल. त्यानंतर लवकरात लवकर ग्राहकांच्या घरी ही औषधे पोहोचवली जाणार आहेत..

‘फ्लिपकार्ट’ अ‍ॅपवर वा वेबसाईटवर औषधे मिळणार नाहीत, तर त्यासाठी ‘फ्लिपकार्ट हेल्थ प्लस’ हेच अ‍ॅप स्वतंत्रपणे डाऊनलोड करावे लागणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे. ‘फ्लिपकार्ट’ कंपनीकडून लवकरच ‘आयफोन’वरील ‘आयओएस’ (iOS) वरही हे अ‍ॅप उपलब्ध करून देणार आहे.

Advertisement

कोरोनामुळे भारतीय नागरिक आता आरोग्याबाबत अधिक सतर्क झाले आहेत. लोकांमध्ये आरोग्य सुविधांबाबत जागरुकता वाढली आहे.. अशा वेळी नागरिकांना स्वस्तात ऑनलाईन औषधे उपलब्ध करुन देणार असल्याचे ‘फ्लिपकार्ट हेल्थ प्लस’चे ‘सीईओ’ प्रशांत झवेरी यांनी सांगितले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement