SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : शरद पवारांच्या घरी गेलेले आंदोलनकर्ते होते ‘फुल टाईट’; तपासात समोर आली ‘ही’ गोष्ट

मुंबई :

एसटी आंदोलकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल केला होता. एसटी आंदोलकांचा हा गट जास्त आक्रमक झाला असल्याचे काल पाहायला मिळाले. चप्पल तसेच दगडही पवारांच्या निवासस्थानावर फेकण्यात आले. या उग्र आंदोलनानंतर राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्याचे गंभीर पडसाद उमटणार, हे निश्चितच होते. आज सकाळपासून मुंबईत महाविकास आघडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

Advertisement

काही वेळापूर्वीच वळसे-पाटील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. सध्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु आहे. दरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या घरी जे आंदोलनकर्ते गेले होते त्यातील काहींनी मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले आहे.

यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आंदोलकांनी मद्यप्राशन केल्याचं FIR मध्ये नमुद करण्यात आलं आहे. सदावर्ते यांच्या भाषणाच्या काही क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यांच्या भाषणात अशी अनेक चिथावणीखोर वक्तव्य आहेत. आपल्या भाषणात सदावर्ते वारंवार शरद पवार यांचा उल्लेख करत होते. झी 24 तासच्या हवाल्याने हे वृत्त आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

Advertisement

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही टीका करत म्हटले आहे की, शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत तर हल्ल्यामागे अतृप्त आत्म्यांचा हात आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे आहेअसे काही असे अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत व त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहेत.

Advertisement