SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुलांसाठी ‘एलआयसी’ची खास पाॅलिसी.., फक्त 100 रुपयांत होणार मुलांचे भविष्य सुरक्षित..!

रोजच वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय.. सगळ्याच गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झालीय.. मुलांचं कसं होणारं, त्यांच्या शिक्षणासाठी, करियरसाठी, त्याला स्वत:च्या दोन पायांवर उभे करताना, आपण कमी तर पडणार नाही ना.. अशी चिंता पालकांना लागलेली असते..

मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक पालक सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन करीत असतात. पालकांची हीच गरज लक्षात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने एक खास योजना जाहीर केलीय.. ‘जीवन तरुण योजना’ (Jeevan Tarun Scheme) असे या योजनेचं नाव..

Advertisement

‘एलआयसी’ची (LIC) ही एक ‘नॉन-लिंक्ड’, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करताना, त्यात बचतीसह मुलांचं भविष्यही सुरक्षित होतं.. मुलांचं शिक्षण नि त्यांच्या इतर गरजा लक्षात घेऊन ‘एलआयसी’ने ही योजना सादर केली आहे.. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

पाॅलिसी कोणासाठी..?
‘एलआयसी’ची ‘जीवन तरुण योजना’ पाॅलिसी 12 वर्षांखालील मुलांसाठी आहे. मुलाचे किमान वय 90 दिवस, तर 12 वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही पॉलिसी 25 वर्षांत ‘मॅच्युअर’ होते.

Advertisement

परताव्याबाबत..
समजा, एखाद्याने 90 दिवस वयाच्या मुलासाठी दरमहा सुमारे 2,800 रुपये (प्रतिदिन 100 रुपयांपेक्षा कमी) गुंतवले, तर मॅच्युरिटीपर्यंत (25 वर्षांत) 15.66 लाख रुपये मिळू शकतात.. त्याच वेळी, तुम्हाला 20 वर्षांसाठी दरमहा 2,800 रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे..

तुमचं मूलं 25 वर्षांचे झाल्यावर या पॉलिसीचे पूर्ण फायदे मिळणार आहेत. या योजनेतून ‘मॅच्युरिटी’च्या वेळी दुप्पट बोनस मिळेल. तुम्ही ही पॉलिसी 75,000 रुपयांच्या किमान विमा रकमेवर घेऊ शकता. मात्र, त्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.

Advertisement

प्रीमियम कसा भरणार..?
‘जीवन तरुण योजने’त वार्षिक, सहामाही, त्रैमासिक वा मासिक आधारावर प्रीमियम भरु शकतो. कोणत्याही मुदतीत प्रीमियम जमा करता येत नसेल, तर त्रैमासिक ते वार्षिक आधारावर ‘प्रीमियम’ भरतात, त्यांना 30 दिवसांचा वाढीव कालावधी मिळेल. दरमहा पेमेंट जमा करीत असल्यास ‘प्रीमियम’साठी तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement