SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्रामीणसह शहरी मार्केटवर कब्जा असणाऱ्या ‘या’ बाईक कंपनीने किमतीत केले बदल; वाचा, नव्या व जुन्या किंमती

मुंबई :

कालच हिरो मोटोकॉर्पने आपल्या सर्वात स्वस्त आणि मायलेज मस्त अशा म्हणवल्या जाणाऱ्या बाईकचे दर वाढवले होते. देशातील सर्वात स्वस्त म्हणवली जाणारी बाईक Hero HF 100 या बाईकचे दर का वाढले, याचे मूळ कारण विविध गोष्टींमध्ये होते. तसेच काही दिवसांपूर्वी मारुती-सुझुकीनेही आपल्या वाहनांचे दर वाढवणार असल्याची घोषणा केली होती. अशातच आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

हीरो मोटोकॉर्पने आपल्या ग्राहकांना झटका देत आपल्या बाइक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. खरं म्हणजे, कंपनीने गेल्या महिन्यात ही घोषणा केली होती की, आपल्या लाइनअपला महाग करणार आहे.

ऑटो सेक्टरमध्येही देशांतर्गत वाढती महागाई, रोज वाढणारे इंधन-धातूचे दर तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. आयात-निर्यात होणाऱ्या गोष्टीत ऑटो सेक्टरचा मोठा वाटा आहे. आणि त्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडीचा परिणाम दिसून येत आहे.

Advertisement

हीरोच्या टॉप एंड व्हेरिएंटच्या नव्या व जुन्या किंमती :-

 

Advertisement
मॉडेल जुन्या टॉप एंड किमती नव्या टॉप एंड किमती
हीरो एचएफ डीलक्स 63770 रुपये 64520 रुपये
हीरो स्पलेंडर 70790 रुपये 71700 रुपये
हीरो स्पलेंडर
हीरो स्पलेंडर 70090 रुपये 72090 रुपये
हीरो पॅशन प्रो 75620 रुपये 75620 रुपये
हीरो सुपर स्पलेंडर 77,600 रुपये
नवीन हीरो सुपर स्पलेंडर 78,600 रुपये 79,600 रुपये
हीरो ग्लॅमर 81700 रुपये 82300 रुपये
नवीन हीरो ग्लॅमर 81870 रुपये 82470 रुपये
हीरो ग्लॅमर एक्सटेक 85920 रुपये 87520 रुपये
हीरो एक्सट्रीम 160आर 1.17 लाख रुपये 1.17 लाख रुपये

 

Advertisement