SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

E-Cycle Subsidy : आता सायकलवर मिळतेय सबसिडी; ‘असं’ करणारं देशातील ‘हे’ पहिलं सरकार

नवी दिल्ली :

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकारे ई- व्हेईकलला प्रमोट करत असतात. पेट्रोल-डीझेलमुळे वाढती महागाईला पर्याय म्हणून अनेक लोक सायकल, ई- व्हेईकलकडे वळत आहेत. आता अशातच दिल्ली सरकारने ई-सायकलवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

दिल्ली सरकारने गुरुवारी आपल्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) सबसिडी धोरणात पर्सनल आणि कार्गो दोन्ही इलेक्ट्रिक सायकलचा समावेश करीत असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच दिल्ली ई-सायकल साठी सबसिडी देण्याची घोषणा करणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य सुद्धा बनले आहे.

केजरीवाल सरकार पहिल्या 10,000 ई-सायकलच्या विक्रीवर प्रति ई-सायकल 5,500 रुपये सबसिडी देणार आहे. यापैकी, आधी खरेदी केलेल्या 1000 ई-सायकलवर 2,000 रुपयांचे अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल. त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी यापूर्वी खरेदी केलेल्या 5 हजार ई-सायकलवर 15-15 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. ई-कार्ट खरेदी करताना व्यक्तीच्या नावावर सबसिडी दिली जात होती. मात्र आता कंपनीलाही 30 हजार रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे, अशी माहिती दिल्लीचे  परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिली.

Advertisement

इलेक्ट्रिक आणि व्यावसायिक दोन्ही मंचावर विविध वापराद्वारे ई-सायकलसाठी वापरासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे दिल्लीत ई-सायकल खरेदी करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया Hero Lectro (हीरो लेक्ट्रो) चे सीईओ आदित्य मुंजाल यांनी दिली.

Advertisement