SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, कारवाया अखेर मागे, एसटी महामंडळाने परिपत्रक केलं जारी..

राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने काळ शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. मागील काही महिन्यांपासून संप सुरु होता त्यावेळी झालेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरील कारवाया, निलंबन अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने परिपत्रक काढले आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेली शिस्तभंगाची, निलंबनाची तसेच बदली याबाबतची कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने परिपत्रक काढलं आहे.

ज्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात संप काळात गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांनी 22 एप्रिलपर्यंत किंवा त्याआधी हजर होण्याची इच्छा दाखवल्यास त्या कर्मचाऱ्यांना लगेचच हजर करून घ्या, अशा सूचना राज्यातील एसटीचे उपमहाव्यवस्थापक, कार्यशाळा व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 एप्रिलपर्यंत जे एसटी कर्मचारी हजर होणार नाहीत, असे कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील, असे एसटी महामंडळाच्या परिपत्रकात म्हटलंय.

Advertisement

ज्या एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ/ सेवेतू कमी करण्यात आले आहे, त्यांना राज्यातील एसटी महामंडळाच्या नियमानुसार, अपील करावे लागणार आहे. ज्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केले आहे, त्या अपील दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांना समज देऊन सेवेत सामावून घेण्याच्या दिवसापासून चार आठवड्यात त्यांचे अपील निकाली काढण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. तसेच जे कर्मचारी अपील निकाली निघाल्याच्या नंतर कामावर रूजू होतील, त्यांना सेवेत सामावून घेतले जाणार आहे, पण त्यांना वेतन थकबाकी मिळणार नाही, हेही न्यायालयाने स्पष्ट केले.

यसोबतच, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत, ते 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कामावर हजर झाल्यास त्यांची सेवासमाप्ती तत्काळ रद्द करावी, मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये, असेही एसटी महामंडळानेकाढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

Advertisement

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना अजून एका गोष्टीबाबत दिलासाही मिळाला आहे. कारण कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या एसटी अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांचे सानुग्रह साहाय्य्य देण्याकरिता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे दावे चार आठवडय़ांत निकाली काढण्यात यावेत, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement