SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाची तारीख ठरली, आता ‘या’ तारखेला पार पडणार विवाह सोहळा..

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे. या अनोख्या जोडीचं लग्न कधी होणार आता याबद्दलची काही उत्सुकता संपली आहे. आता या चर्चांवर पूर्णपणे विराम दिला गेला आहे. कारण आलिया भट्टच्या घरच्या मंडळींकडूनच आलीय-रणबीरच्या लग्नाची तारीख कळवली गेली असल्याचं समजतंय. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता काही दिवसांतच या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळणार आहे.

आलिया आणि रणबीर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीखही निश्चित झाली आहे. आलीय भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाच्या तारखांची माहिती दिली आहे. 13 तारखेला मेहंदी आणि 14 तारखेला विवाहसोहळा पार पडणार आहे अशी माहिती आलियाच्या काकांनी दिली. 13-14 एप्रिल रोजी ते सप्तपदी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या बातमीनंतर लगेचच आलिया आणि रणबीर कपूर यांच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Advertisement

रॉबिन भट्ट यांनी एका न्यूज चॅनल उत्तर देताना म्हटलं की, “आलिया-रणबीर यांच्या विवाह सोहळ्याच्या तारखेबद्दल सांगायचं झालं तर 13 तारखेला मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि 14 तारखेला विवाहसोहळा दणक्यात पार पडणार आहे,” असं त्यांनी सांगितलं. यापूर्वीही आलिया- रणबीरच्या लग्नाची चर्चा होत असताना त्यांनीच सांगितलं होत की, त्यांचं लग्न 15-16 तारखेला होणार असून ते चार दिवस मोठा कार्यक्रम चालणार आहे, असं म्हटलं होतं.

“तुम्ही आता माझ्यावर विश्वास ठेवा किंवा मी जे आधी बोललो त्यावर विश्वास ठेवा! पण लग्न समारंभ 15 आणि 16 तारखेला नाहीच आहे. आलिया आणि रणबीर 13-14 एप्रिल रोजी लग्न करणार आहेत. लग्नाचे हे दोन दिवस नक्की आहेत आणि ऑफिशियल फंक्शन्ससुद्धा या दोन दिवसांतच आहेत. त्यानंतर लोक मोठी पार्टी एन्जॉय करतील. याशिवाय मी इन्वायटिंग कमिटीचा भाग नाही, त्यामुळे या लग्नात कोण येणार हे मला नेमकं सांगता येणार नाही. सध्या मला लग्नाचं कार्ड मिळालं नसून फक्त फोनवर माहिती मिळाली आहे,” असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आलिया-रणबीरने लग्नाची तयारी सुरु केली असल्याचं म्हटलं जात आहे, कारण त्यांचा नुकताच एका साडी फॅशन ब्रँड व डिझायनरसोबतचा फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement