SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.मित्रांच्या मदतीने, व्यवसाय वाढीसाठी अधिक परिश्रम करण्याची अपेक्षा आहे. रखडलेली सरकारी कामं लवकरच मार्गी लागतील. आरोग्य नीट राहिल. कुटुंबातील व्यक्तींसमवेत आपण सल्ला- मसलत कराल.

वृषभ (Taurus): अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. आईशी मनमोकळेपणा वाढेल तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

मिथुन (Gemini) : सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. तुमच्या कामाने काही लोक सहमत आणि संतुष्ट होतील. एखाद्याशी दीर्घकाळ चर्चा कराल. विचारपूर्वक केलेली कामे पूर्ण होतील. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल. एखाद्या गोष्टीवरून आपला मूड खराब करून घेऊ नका.

कर्क (Cancer) : दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. उत्तम गृहसौख्य लाभेल. मंगल कार्ये आणि नव्या कार्यासाठी शुभ दिवस आहे. जोडीदार तसेच मुलांकडून खुशखबर मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मित्र मंडळ तसेच वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. देवाची कृपा कायम राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल.

Advertisement



सिंह (Leo) : आपले प्रभुत्व दाखवाल. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल. स्थायी संपत्तीद्वारे तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी ब्रोकर्ससाठी ही शुभ वेळ आहे. व्यापारात वाढ होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. थांबलेली कामे पूर्ण होतील. गृहसजावट आणि इतर बाबींमध्ये बदल करण्यात आवड निर्माण होईल.

कन्या (Virgo) : आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल. या दिवशी तुम्हाला यश मिळेल. नेतृत्वगुण चांगले असल्याने त्याचा फायदा होईल. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असेल. जुनी देणी वसूल होतील. चांगले कार्य हातून घडेल. कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल.

तुळ (Libra) : संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल. पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जीवन साथीचे सहकार्य मिळेल. लव लाइफ शानदार राहील. जुगाराची हौस पूर्ण कराल. घाई करू नका.

वृश्‍चिक (Scorpio) : कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.अनेक दिवसांपासून प्रलंबित काम पूर्ण होईल. कामात प्रगती होईल. गरीबांना अन्न दान करा. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल. कामाचा व्याप वाढल्याने तब्बेतीची कुरकुर वाढेल.

Advertisement



धनु (Sagittarius) : दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. नवी कामे मिळतील. व्यवसायात वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील. नोकरीमध्ये प्रभाव पडेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्व बाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

मकर (Capricorn) : घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.शारिरीक कष्टामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल. मोठा खर्च होऊ शकतो. आर्थिक स्थिती बिघडू शकते. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतात. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक आणि मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल.

कुंभ (Aquarious) : जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका. मित्र तसेच नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वेळेचा सदुपयोग कराल. चिंता वाढू शकते. जोखीम उचलण्याची तयारी दाखवाल. धन प्राप्ती होऊ शकते. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन (Pisces) : योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे. यश तुमचे दार ठोठावणार आहे. घरातील कामात व्यस्त असाल. मीडिया आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी यशाचा दिवस आहे. राजकारण्यासाठी दिवस अत्यंत फलकारक आणि भाग्य उजळविणारा आहे. आरोग्य ठणठणीत राहील.

Advertisement