SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“ती माझी मोठी चूक होती”, सचिन तेंडुलकरबाबत शोएब अख्तरच्या आठवणीत आजही आहे ‘तो’ किस्सा..

क्रिकेट म्हटलं की, चाहत्यांचा आवाज आणि आठवतात आपापले फेव्हरेट क्रिकेटर्स. मागील 8-10 वर्षांपूर्वी स्टेडियमध्ये एकच आवाज सर्वात जास्त घुमायचा तो म्हणजे सचिन….सचिन….!! हे तुम्हाला माहीतच असेल. पण हे नाव आजदेखील जास्त घेतलं जात ते म्हणजे रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ओळख असलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर बरोबर काही किस्स्यामुळे. गोष्टही तशीच आहे, कारण खुद्द शोएबने एक किस्सा सांगितला आहे आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शोएब अख्तरची खुन्नस आणि भारताचे सचिन-सेहवाग जोडी ही त्यावेळेस खूपच रंगत असे. एक घटना आज आम्ही क्रिकेटबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये मुंबईकरांच्या रागाचा सामना शोएब अख्तरला करावा लागला होता.
जेव्हा कोणाच्या तोंडात नावही नसेल असा पहिला आयपीएलचा सिझन 2008 मध्ये खेळवला गेला. या सीझनमध्ये केकेआर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना शोएब अख्तरने पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला बाद केलं. तुम्ही म्हणाल आता यात एवढं काय? पण यानंतर जे झालं ते शोएबदेखील पाहतच राहिला. त्याच्या ते आजही आठवणीत आहेत.

Advertisement

झालं असं की, वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मुंबई विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबईचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला आउट केलं. मग काय एकच शांतता झाली. पण ही शांतता म्हणजे फक्त एक छोटीसी झलक होती. मुंबईमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईपेक्षाही जास्त चाहते होते ते सचिन तेंडुलकरचे. म्हणून मुंबईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते. पण पहिल्याच ओव्हरमध्ये शोएबने सचिनला आउट केल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला.

काही वेळानेच मुंबई संघाच्या चाहत्यांनी शोएब अख्तरवरच सचिन लवकर आउट झाल्याचा आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली. त्यावेळेस तो क्षेत्ररक्षणासाठी बाउंड्री लाईनवर थांबला होता. प्रेक्षकांच्या अनेक कॉमेंट्स चालल्या होत्या. मग त्यावेळेस सौरव गांगुली हा केकेआर संघचा कॅप्टन होता. संघाचा कॅप्टन या नात्याने त्याने संघातील खेळाडूची जबाबदारी स्वीकारत पुढाकार घेतला आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

स्पोर्ट्सकिडाशी बोलताना शोएबने म्हणाला, “ते फारच सुंदर स्टेडियम होतं आणि वातावरणही छान होतं. स्टेडियम अगदी फुल भरलं होतं, पण मी पहिल्याच षटकात सचिन तेंडूलकरला बाद केलं आणि ती माझी मोठी चूक ठरली. त्यानंतर मी जेव्हा फाईन लेगला क्षेत्ररक्षणाला गेलो तेव्हा मला मुंबईच्या चाहत्यांचा राग सहन करावा लागला. तेव्हा सौरव गांगुलीने मला मीड लेगला येण्यास सांगितलं. सचिनला बाद केल्यानंतर मुंबई संघाच्या चाहत्यांचा असा संताप पाहून सौरव गांगुलीला क्षेत्ररक्षणात असे बदल करावे लागले. तसेच गांगुलीनेही डायलॉग करत “ते लोक तुला मारून टाकतील. मुंबईत येऊन सचिनला बाद करायला कोणी सांगितलं”, असं म्हणाला. या गोष्टी आज ऐकून भारताचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या सचिनवर चाहत्यांचं प्रेम किती आहे हे दिसून येत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement