SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उन्हाळ्याचा तडाखा! आता ग्राहकांना एका लिंबूसाठी मोजावे लागणार इतके रुपये….

देशात काही दिवसांपासून सुरु असलेली उष्णतेची लाट कायमच असून, सूर्य आग ओकत असल्याने मंगळवारी जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, कमाल तापमान 44.2 अंश सेल्सियस कमाल तापमानासह मंगळवारी अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. तप्त झळा सहन होत नसल्याने नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत. तर, कोल्ड्रींक्स, आणि थंडगार उन्हाळी फळांचा ज्यूस, सरबत पिणे यांवर लोकांचा जोर वाढला आहे.

गर्मीपासून आराम मिळण्यासाठी कलिंगडाच्या खाण्यासोबत लिंबूचे सरबतही लोक पित आहेत. आता सध्या कलिंगडची मागणी वाढली असून त्याबरोबरच लिंबाचे भाव (Lemon Rate) वाढले आहेत. बाहेर उन्हाचा चटका असल्याने आता लोक घरात राहूनच लिंबू सरबत किंवा शेतामधील झाडाखाली बसून निवांत थंडगार कैरी-लिंबू सरबताचा आस्वाद घेत आहेत. पारंपरिक लिंबू शरबतचे स्टॉलही आता बाजारात जागोजागी लागले आहेत.

Advertisement

मागील दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे घरातच जास्त दिवस काढावे लागले आहेत म्हणून यंदा नागरिक बाजारपेठ फिरण्यास आणि थंडावा मिळेल असेल पदार्थ, ज्यूस, आईस्क्रीम, कुल्फी खाण्यास उत्सुक आहेत. पण तुमच्यासाठी आता हे थोडंसं महाग पडू शकत. करणं सध्या लिंबू बाजारात येताच त्याच्या दरात तेजी दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सिझनमध्ये फक्त पेट्रोल डिझेलचा नाही तर आंबा, लिंबू या दोन फळांचे भाव गगनाला भिडले आलेत.

नेहमीप्रमाणे उन्हाळ्यात लिंबाचे भाव वधारले असून सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचाही परिणाम लिंबांच्या भावावर झाला आहे. महाराष्ट्रामधील लिंबू अनेक राज्यात पाठवले जातात. आंध्र प्रदेश सर्वात जास्त लिंबाचे उत्पादन करणारे राज्य आहे.मागील वर्षी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने खूप जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. यामध्ये लिंबांच्या बागेचं मोठं नुकसान झाल्याने बाजरात लिंबाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे यंदा लिंबांची चांगलीच दरवाढ पाहायला मिळत आहे. अंदाजे सांगायचं झालं तर गुजरातच्या सुरत मार्केटमध्ये लिंबू 200 ते 250 रुपये किलोने विकले जात आहेत. मुंबईतही यांसारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Advertisement

राज्यातील इतर भागातील ग्राहक 5 ते 10 रुपयांत महिनाभर पुरणारे लिंब आता पावशेर च्या मापात घेत आहेत. पुण्यातील घाऊक मार्केटमध्ये एका लिंबाची तब्बल पाच रुपये एवढी झाली असल्याची माहिती एका व्यापाऱ्याने दिली, तर किरकोळ मार्केटमध्ये हे लिंबू 10 ते 12 रुपयांना विकले जाते. मार्केटमध्ये येणारी लिंब जवळजवळ 60% कमी झाली आहेत, असं अंदाज आहे. महिनाभरापूर्वी पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे विक्री होणा-या लिंबाच्या किंमतीत या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने मोठी वाढ झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement