SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : ST कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या घरावर दगड आणि चप्पलफेक; घडला ‘हा’ प्रकार

मुंबई :

मागील पाच महिन्यांहून अधिक काळापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी मुंबई उच्च न्यायालयाने ठोस निर्णय दिला होता. त्यानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या तिढा सुटला, असे दिसत असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ‘२२ एप्रिलपर्यंत जे संपकरी कर्मचारी कामावर रुजू होतील त्यांना बेकायदा संपातील सहभागाबद्दल सुरू झालेल्या कारवाईपासून पूर्णपणे अभय असेल, जे कर्मचारी या मुदतीत कामावर रुजू होणार नाहीत, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा मार्ग राज्य सरकार व एसटी महामंडळाला मोकळा असेल’, असे आदेश खंडपीठाने दिले होते.

Advertisement

मात्र आता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आक्रमक होत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर कूच केली. सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. आंदोलकांनी थेट पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल तसेच दगड फेक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. त्यामुळे नाईलाजाने सुप्रिया सुळे या सिल्वर ओक निवासस्थानात परतल्या. मी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्यांच्याकडून सुरू असलेल्या या गोंधळाच्या वातावरणात चर्चा होऊ शकत नाही असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Advertisement