SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसटी कर्मचाऱ्यांची पवारांच्या घरावर चप्पलफेक ‘त्यांच्यामुळेच’; बघा, नेमका कुणावर आणि का होतोय आरोप

मुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन (ST employees protest outside Sharad Pawar house) केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली आहे. या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली तसेच इतक्या मोठ्या राजकीय नेत्याच्या मुंबईतील घराबाहेर अशा प्रकारे आंदोलन होणं म्हणजे पोलीस, गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचं बोललं जात आहे.

Advertisement

दरम्यान काल कोर्टाच्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळला होता. मात्र आज अचानकपणे झालेल्या आंदोलनामागे कुणाचा हात आहे, यावरही बोललं जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूमिका खाली दिलेल्या आहेत, यावरून स्पष्टपणे लक्षात येते की, त्यांनी नेमकं कुणाकडे बोट दाखवले आहे.

अमोल मिटकरी (आमदार) :-सिल्वर ओकवर काही मुठभर लोकांना हाताशी धरून आक्रमण करू पाहणाऱ्या वर्गाचा मास्टर माईंड शोधणे गरजेचे. यामागे नेमका कोण? कोर्टात वकिली करणारा? शेतकऱ्यांच्या जीवावर उदार झालेला? की मंगळसुत्र चोर?

Advertisement

दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री, महाराष्ट्र) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे.

प्रशांत जगताप (माजी महापौर व एनसीपी शहराध्यक्ष, पुणे) :- आरएसएस आणि भाजपच्या मेहेरबानीवर जगणारा माथेफिरू सदावर्ते याने आंदोलनकर्त्यांना भडकावून आदरणीय पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला. सत्ता नसल्यामुळे भाजप अशा उपद्रवी लोकांना हाताशी धरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कठोर कारवाई करावी ही विनंती.

Advertisement

मेहबूब शेख (युवक प्रदेशाध्यक्ष, एनसीपी) :- आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करणाऱ्यांचा जाहीर निषेध! न्यायाचे, संविधानाचे भाषण द्यायचे; आणि इकडे येऊन दगडफेक करायची. गैरवर्तन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी! हा प्रकार अक्षम्य आहे.

Advertisement