SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘दारुच्या नशेत ‘आरसीबी’च्या खेळाडूने मला 15व्या मजल्यावर लटकावलं…!’, ‘या’ खेळाडूचा खळबळजनक दावा..!

क्रिकेटच्या मैदानात घडलेले अनोखे किस्से नेहमीच वाचायला, पाहायला, ऐकायला मिळतात. त्यातून कधी मनोरंजन होतं, तर कधी आश्चर्याचा धक्काही बसतो.. क्रिकेटच्या मैदानावर मैत्री फुलते, तसेच इथं गंभीर वादही पेटले आहेत. काही माध्यमांमधून समोर येतात, तर काही तसेच हवेत विरले जातात..

आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत, जो भारताच्या दिग्गज लेग स्पिनरसोबत घडलाय.. या लेग स्पिनरचं नाव आहे, यजुवेंद्र चहल…!

Advertisement

‘आयपीएल’मध्ये सुरुवातीला चहल हा ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळला. नंतर ‘राॅयल चॅलेंजर बंगळुरु’ संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तो बराच काळ ‘आरसीबी’कडून खेळला. यावर्षी झालेल्या ‘मेगा ऑक्शन’मध्ये 6.50 कोटी रुपयांची बोली लावून ‘राजस्थान रॉयल्स’ने त्याला आपल्या संघात सामील केलं..

दरम्यान, राजस्थान संघातीलच आर. अश्विनने नुकतीच चहलची मुलाखत घेतली. त्यावेळी तिथं करुण नायरही उपस्थित होता. 2013च्या ‘आयपीएल’दरम्यान घडलेला एक भयानक किस्सा चहलने सांगितला…

Advertisement

नेमकं काय घडलं..?

चहल म्हणाला, की “हा किस्सा 2013 सालचा आहे… त्यावेळी मी ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळायचो.. बंगळुरुमध्ये ‘मुंबई इंडियन्स’ विरुद्ध ‘आरसीबी’मध्ये सामना होता. सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंसाठी बंगळुरुमध्ये खास पार्टीचं आयोजन केलं होतं. सगळे खेळाडू पार्टीत मजा करीत होते…!”

Advertisement

“पार्टीत एका खेळाडूला दारु जास्त झाली. तो बराच वेळ माझ्याकडे पाहत होता. नंतर थोड्या वेळाने त्यानं मला बोलवलं व मला घेऊन तो इमारतीच्या 15व्या मजल्यावरील बाल्कनीत गेला. नंतर अचानक त्यानं मला उचलून बाल्कनीतून खाली लटकवलं. आता माझं काय होणार, या कल्पनेनंच मी घाबरलो होतो..”

Advertisement

“मी दोन्ही हातांनी त्याचं डोकं घट्ट धरुन ठेवलं.. चुकून जरी माझा हात सुटला असता, तरी 15व्या मजल्यावरून मी थेट खाली पडलो असतो. हा प्रकार पाहून तिथं काही खेळाडू धावले.. त्यांनी मला सोडवलं. माझी सुटका झाली, तेव्हा मला काही वेळ स्वर्गाला हात लावून आल्यासारखं वाटत होतं. मी खूप घाबरलो होतो.”

“काही खेळाडूंनी मला प्यायला पाणी दिलं. या घटनेनंतर आपण कुठेही गेल्यावर किती जबाबदारीने वागायला हवं, हे मला समजलं. माझ्या आयुष्यातला हा सर्वात भीतीदायक प्रसंग होता..अर्थात माझ्याबरोबर हे कोणी केलं होतं, त्याचं नाव मात्र मी तुम्हाला सांगणार नाही..” असंही चहलने स्पष्ट केलं..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement