SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिवसेनेला अजून मोठा झटका; ‘त्या’ नेत्याच्या रात्रीतून केल्या 41 मालमत्ता जप्त; हॉटेल, फ्लॅट्सचाही समावेश

मुंबई :

आयकर विभागाच्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्याला अजुन एक मोठा झटका बसला आहे. नुकतीच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर ED ने कारवाई केली होती. या घटना होते न होते तोच शिवसेना नेते व स्थायी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत.

Advertisement

यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मोहिते नावाच्या नातेवाईकालाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये भायखळा येथील फ्लॅट्स, हॉटेल आणि वांद्र्यातील एका फ्लॅटचा समावेश आहे. या प्रकरणात लवकरच सक्तवसुली संचलनालयाची एंट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढू शकतात.

काही दिवसांपूर्वीच जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांनी मिळालेल्या माहितीनंतर आचा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या ५ कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जाधव दाम्पत्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर चार दिवस त्यांची चौकशी सुरु होती. जाधव आणि त्यांची पत्नी यामिनी जाधव यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे.

कंत्राटदार बिमल अग्रवाल यांच्या कंपनीच्या माध्यमातून जाधव यांच्या नातेवाईकांच्या नावावर मालमत्तांची खरेदी करण्यात आली. त्यासाठी रोख रकमेत व्यवहार झाले. ही रक्कम बेहिशोबी असल्याचं आयकर विभागाच्या कारवाईतून समोर आली. या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे लवकरच ईडीकडून जाधव यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास जाधव यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

Advertisement