SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘या’ ॲपवर काही सेकंदातच मिळणार व्हेरिफाइड टिक, येतंय धमाकेदार फिचर…

भारतातील मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल मीडिया ॲप ‘कू’ एक अतिशय धमाकेदार फिचर आणत आहे. ज्याने तुमचं ‘कू प्रोफाइल’ चांगलंच भारी दिसणार आहे . तर तुमच्या अकाउंटचा दर्जा वाढवण्यावर आता कू ॲप भर देणार आहे. कारण आता कू एक जबरदस्त फिचर म्हणजेच वैशिष्ट्य सादर करण्याचा प्लॅन आखत आहे. महत्वाचं म्हणजे हे फिचर आतापर्यंत जगातील कोणत्याच ॲपमध्ये आणलं गेलं नाहीये. मग जाणून घेऊ या फीचरमध्ये असं काय विशेष आहे ते..

फेसबुक असो की इंस्टाग्राम, टिकटॉक असो की ट्विटर आणि भारतातील कू ॲप या सर्व ॲपवर असणारे यूजर्स टिक मिळविण्यासाठी किंवा प्रोफाइल व्हेरीफाईड करण्यासाठी खूप घाई करत असतात. त्यांना त्यासाठी वेगवेगळ्या युनिक पोस्ट टाकून यूजर्सना एंगेजही करावं लागत. त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यामागे ते खूप कष्ट घेतात. आता एवढी मेहनत न घेताही अशा मेहनतीला ‘कू ॲप’ फळ देणार आहे. कारण Koo App हे जगातील पहिलंच सोशल मीडिया ॲप ठरणार आहे की जे यूजर्सना स्वतःच्या इच्छेवर सेल्फ व्हेरिफाय करून टिक लावण्याचं स्वातंत्र्य देणार आहे. मग आहे ना मोलाची गोष्ट..?

Advertisement

कू ॲपचे हे फिचर इतर ॲप्सच्या फीचरप्रमाणे काम करत सल तरी यात सेल्फ वेरीफाय टिक या नवीन गोष्टीमुळे यात नवीनपणा आला आहे. हे जगातील एकमेव फिचर आहे कू ॲपमध्ये येणार आहे. कू चे प्रतिस्पर्धी असणारे ट्विटर आता यावर नक्कीच विचार करेल. कू आता त्याच्या वापरकर्त्यांना स्वत: च्या प्रोफाईलची पडताळणी करण्यास अनुमती देणार आहे. या प्रक्रियेनंतर हिरव्या रंगाचे टिक (Green Tick) यूजरच्या अकाउंटला सेल्फ-वेरिफाइड झाल्याच्या रुपात एक खास ओळख देईत.

याउलट ट्विटर (Twitter) मुख्यतः सेलिब्रिटी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींसाठी (influencer) व्हेरीफाईड प्रोफाइलला अनुमती देते. इतर सामान्य व्यक्तींसाठी हे मिळवणे कठीण असते. तर काहींना ते मिळविण्यासाठी त्याला आठवडे किंवा काही महिने लागतात. अशा संपूर्ण प्रक्रियेतून तुम्हाला जाण्याची आवश्यकता असते.दुसरीकडे कू यासाठी अगदी काही मिनिटांतच तुमचं प्रोफाइल व्हेरीफाईड करणार आहे.

Advertisement

सेल्फ व्हेरीफाईड फिचर कसं काम करेल..?

या फीचरच्या माध्यमातून यूजर्स सरकारी ओळखपत्राचा क्रमांक ‘कू’वर भरू शकतील. त्यानंतर आधार क्रमांक लिंक असलेल्या नंबरवर आलेला ओटीपी टाकतात आणि यशस्वी प्रमाणीकरण झाल्यावर त्यांच्या प्रोफाईल्स हिरव्या रंगाच्या टिकसह सेल्फ-व्हेरिफाय होतात. ही सगळी प्रक्रिया अगदी काही क्षणातच पूर्ण होते. विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया सरकारद्वारे, अधिकृत थर्ड पार्टी द्वारे केली जाते. Koo वरची ऐच्छिक सेल्फ-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे. ही पडताळणी प्रक्रिया भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) अधिकृत थर्ड-पार्टीद्वारे केली जाते.

Advertisement

“कू प्लॅटफॉर्मवर यूजर्सना सशक्त बनवण्यासह प्रामाणिकतेला प्रोत्साहन देत ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन स्तरावर चुकीची माहिती, अभद्र भाषा, वाईट वर्तन आणि फसवणुकीला आळा बसेल अशीही आशा आहे’, असं कू चे फाउंडर अप्रमेय राधाकृष्ण यांनी सांगितलं आहे. याद्वारे यूजर्स आता काही सेकंदातच सेल्फ-वेरिफिकेशन मिळवू शकतात. या प्रक्रियेदरम्यान Koo App यासंबंधीची कुठलीच माहिती स्वत:कडे साठवत नाही. अशीही माहिती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement