SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : आता सर्वांना मिळणार बुस्टर डोस.. मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय..!

भारतात आता कोरोनाच कहर बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसत आहे. जनजीवन पूर्वपदावर आलंय. कोरोना संसर्ग कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने कोविडचे सारे निर्बंध हटवले. कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी पावले उचलली जात असून, त्यासाठी मोदी सरकारने आज (ता. 8) एक मोठा निर्णय घेतला आहे..

देशातील 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला आता सरसकट खासगी लसीकरण केंद्रांवर कोरोनाचा (Corona) ‘प्रिकॉशनरी डोस’ दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलीय.. त्यानुसार, येत्या 10 एप्रिलपासून हे डोस दिले जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Advertisement

शिवाय पहिल्या व दुसऱ्या डोससाठी मोफत लसीकरण कार्यक्रम, तसेच सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. त्याला आणखी गती दिली जाणार असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे..

Advertisement

मुलांचे लसीकरण जोरात

दरम्यान, सध्या भारतात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, सहव्याधी असलेले नि 60 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाचा तिसरा बुस्टर डोस दिला जात आहे. तसेच, 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचेही कोरोना लसीकरण जोरात सुरु आहे..

Advertisement

सध्या देशातील 15 वर्षे वयोगटातील सुमारे 96 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा किमान एक डोस देण्यात आलेला आहे.. तर 15 वर्षांवरील सुमारे 83 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत.

देशातील हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील लोकांना 24 दशलक्षाहून अधिक प्रतिबंधात्मक डोस दिले आहेत. 12 ते 14 वर्षे वयोगटातील 45 टक्के मुलांना कोरोनाचा पहिला डोस दिल्याचे सरकारी आकडेवारी सांगते..

Advertisement

कोरोना लसीकरण जोरात सुरु असतानाच, आता मोदी सरकारने देशातील नागरिकांना 10 एप्रिलपासून सरसकट कोरोनाचा तिसरा बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे..!

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement