SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे येणार नाहीत? पीएम किसान योजनेची ‘ही’ सुविधा झाली बंद..

केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनेपैकी एक म्हणजे पीएम किसान सम्मान निधी योजना होय. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे की, तुम्हाला ई-केवायसी करायला अडचणी येण्याच्या शक्यता आहेत. आता घरबसल्या मोबाईलवरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करता येणार नाही. पण यामुळे योजनेचा लाभ घेणं नक्कीच थांबणार नाहीये. यावर सरकारने अजून एक पर्यायाची आठवण करून दिली आहे.

शेतकरी वर्गाने लक्ष देऊन पीएम किसान सन्मान निधीची https://www.pmkisan.gov.in/ ही वेबसाईट तपासायची आहे. वेबसाईट उघडली असता समोरच केवायसी बाबत 31 मे पर्यंतची मुदत आणि केवायसीबाबत कशी समस्या येणार आहे हे सांगितलं आहे. लक्षात असू द्या की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना केवायसी करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. अन्यथा आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत येणारी आर्थिक मदत देखील खात्यावर येणार नाही.

Advertisement

मग केवायसी करायचं कसं..?

आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी काही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत.अन्यथा त्यांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो.

Advertisement

अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या फोनवरून घरी बसून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती. पण आता यामध्ये मोठा बदल झाला असून शेतकऱ्यांना आता आपल्या मोबाईलवरुन ई-केवायसी करता येणार नाही. कारण सरकारने ओटीपी बेस्ड ई-केवायसी सुविधा ही तात्पुरती थांबवली आहे. ही सेवा आता नेमकं कधी सुरु होणार आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप नाहीये.

आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर: आता केवायसी (KYC) करण्यासाठी, शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मध्ये जावं लागेल, तिथे जाऊन शेतकऱ्यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे केवायसी प्रक्रिया करावी लागणार आहे.

Advertisement

पीएम किसान सन्मान योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक (eKYC is MANDATORY) असून सरकारने अंतिम तारखेत वाढ करत 31 मे 2022 पर्यंत केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी मुदत दिली आहे. शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) संपर्क साधावा लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement