SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतातील सर्वात स्वस्त बाइकच्या किंमतीत झाला ‘एवढा’ बदल; देते ‘एवढं’ मायलेज

मुंबई :

ऑटो सेक्टरमध्येही देशांतर्गत वाढती महागाई, रोज वाढणारे इंधन-धातूचे दर तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. आयात-निर्यात होणाऱ्या गोष्टीत ऑटो सेक्टरचा मोठा वाटा आहे. आणि त्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडीचा परिणाम दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मारुती-सुझुकीने आपल्या वाहनांचे दर वाढणार, असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ इतर कंपन्याही अशाच घोषणा करण्याच्या तयारीत असताना एक मोठी बातमी समोर आलेली आहे. हिरो मोटोकॉर्पने आपल्या सर्वात स्वस्त आणि मायलेज मस्त अशा म्हणवल्या जाणाऱ्या बाईकचे दर वाढवले आहेत.

Advertisement

देशातील सर्वात स्वस्त म्हणवली जाणारी बाईक Hero HF 100 या बाईकचे दर आता वाढणार आहेत. मात्र दर वाढूनही हीच बाईक देशातील सर्वात स्वस्त बाईक असणार आहे. हिरोने या बाइकच्या किंमतीत 250 रुपयांहून जास्त वाढ केली आहे. आधी या बाइकची दिल्ली एक्स शोरूम किंमत 51 हजार 200 रुपये होती आता ती वाढून 51 हजार 450 रुपये झाली आहे.

या बाईकचा दमदार अनुभव असल्याने ग्रामीण आणि शहरी भागात ही बाईक जास्त विकली जाते. तसेच ही बाईक स्वस्त असल्याने लोकांचा या बाईककडे जास्त ओढा असतो. हे पेटेंट i3s किंवा आयडियल-स्टार्ट-स्टॉप सिस्टम सोबत येते. ज्यात पेट्रोलचा वापर कमी होतो. याच कारणामुळे यात 70 किमी प्रति लीटरचे शानदार मायलेज मिळते. Hero HF 100 भारतीय बाजारात केवळ एकाच रंगात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना यात केवळ ब्लॅक अँड रेड थीम मिळते. आता या बाईकचे दर वाढल्याने आता ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे. कारण on-road किंमत ही अधिक असते.

Advertisement